भारतीय लष्कराचे नवे उप प्रमुख बनले लेफ्टनंट जनरल एस.के. सैनी

नवीदिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय सैन्याच्या दक्षिणी कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल एस. के. सैनी हे सैन्य दलाचे नवीन उपप्रमुख असतील. प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवस आधी ते आपला पदभार स्वीकारतील. सैन्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शुक्रवारी याबाबतची माहिती दिली.

लेफ्टनंट जनरल एम.एम.नरवणे यांची सेनाप्रमुख पदावर बढती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्याजागी आता एस. के. सैनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सैनिक स्कूल कपूरथळा आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे माजी विद्यार्थी असलेले सैनी जून 1981 मध्ये जाट रेजिमेंटमध्ये नियुक्त झाले होते.

सैनी यांनी त्यांची बटालियन (7 जाट) चे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधी नेतृत्व केले होते. तसेच पुणे मुख्यालयाची कमान सांभाळण्याआधी ते पश्चिमी थिएटरमध्ये अधिकारी होते. सैनी हे नॅशनल सिक्युरिटी गार्ड ट्रेनिंग सेंटरमध्ये वेपण इन्स्ट्रक्टर आणि नवी दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेजमध्ये सिनियर डायरेक्टिंग स्टाफ म्हणून देखील कार्यरत होते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like