चांगली बातमी ! भारतात कमी झाली ‘गरीबी’, ‘इतक्या’ वर्षात देशानं मिळवलं ‘हे’ मोठे यश

पोलीसनामा ऑनलाइन : भारतात 2005-06 पासून 2015-16 च्या दरम्यान 27.3 कोटी लोक गरीबीच्या कक्षेतून बाहेर आले आहेत. ही या दरम्यानची कोणत्याही देशातील गरीबांच्या संख्येतील सर्वाधिक घट आहे. संयुक्त राष्ट्राच्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती दिली आहे.

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (यूएनडीपी) आणि ऑक्सफोर्ड गरीबी आणि मानव विकास अभियान (ओपीएचआय) द्वारे जारी करण्यात आलेल्या आकड्यांवरून समजते की, 75 पैकी 65 देशांत 2000 ते 2016 दरम्यान बहुआयामी गरीबी स्तरात खुप घट झाली आहे.

बहुआयामी गरीबी दैनंदिन जीवनात गरीब लोकांद्वारे अनुभवल्या जाणार्‍या विविध अभावांना समाविष्टित करते – जसे की, खराब आरोग, शिक्षणाचा अभाव, जीवनस्तरात अपुरेपणा, कामाची वाईट गुणवत्ता, हिंसेचा धोका, आणि अशा क्षेत्रात राहाणे जे पर्यावरणासाठी धोकादायक आहे.

या 65 देशांपैकी 50 देशांनी गरीबीत राहाणार्‍या लोकांची संख्या कमी केली आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, सर्वात मोठी घट भारतात झाली आहे, येथे 27.3 कोटी लोक गरीबीच्या वर येण्यात यशस्वी झाले आहेत.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चार देश- आर्मेनिया (2010-2015 / 2016), भारत (2005 / 2014-15 / 2016), निकारागुआ (2001-2011 / 2012) आणि उत्तर मॅसेडोनिया (2005/2014) ने आपल्या जागतिक बहुआयामी गरीबी सूचकांक (एमपीआय) निम्मा केला आहे. हे देश दर्शवतात की खुप भिन्न गरीबी स्तरांच्या देशांसाठी काय शक्य आहे.

रिपोर्टनुसार चार देशांनी आपले एमपीआय मूल्य अर्धे केले आणि बहुसंख्यांक गरीब लोकांच्या संख्येत सर्वात मोठी (27.3 कोटी) घट आली.

रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चौदा देशांनी आपल्या सर्व उप-प्रादेशिक क्षेत्रांमध्ये बहुआयामी गरीबी कमी केली. बांगलादेश, बोलीविया, किंगडम ऑफ एसावातिनी, गॅबॉन, गाम्बिया, गुयाना, भारत, लायबेरिया, माली, मोजाम्बिक, नायजर, निकाराबुआ, नेपाळ आणि रवांडा, हे ते देश आहेत.’

मात्र यामध्ये शंका व्यक्त केली गेली की, गरीबीच्या आघाडीवर झालेल्या प्रगतीवर कोरोना व्हायरस महामारीचा आणि 2015 नंतरच्या इतर स्थितीचा प्रतिकुल परिणाम पडू शकतो.