अभिमानास्पद ! भारताने इतिहास रचत नदी मार्गाने जोडले बांगलादेश आणि भूतानला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने एक इतिहास रचला आहे. भारताने बांगलादेश आणि भूतानला भारतीय नदी मार्गाने जोडले आहे. केंद्रीय मंत्री मनसुख लाल मांडवीयने शुक्रवारी व्हिडिओ कँन्फरेन्सच्या माध्यमातून पहिल्यांदा भूतानपासून बांगलादेशसाठी एक हजार टन छोट्या दगडांनी भरलेला मालवाहतूक करणारे जहाज रवाना करण्यात आला आहे.

बांगलादेश आपल्या निर्माण कार्यासाठी भूतानकडून रस्ते मार्गाने दगड आयात करत होता. भारताच्या मदतीने पहिल्यांदाच ब्रह्मपुत्र नदी मार्गाने माल पाठवण्याचे काम करण्यात येत आहेत. मांडवीय यांनी याबाबत सांगितले की, जलमार्गाने माल पाठवत भारताने इतिहास रचला आहे. यामुळे फक्त भारताला फायदा होणार नाही तर भूतान आणि बांगलादेशला फायदा होऊन त्यांच्याशी भारताचे संबंध आधिक चांगले होतील. त्यांनी सांगितले की भूतानमधून बांगलादेशात हे पाठवण्यासाठी ब्रम्हपूत्रा जलमार्गाचा वापर झाला आहे. त्यांनी असे ही सांगितले की देशात कमीत कमी १० जलमार्गावर वेगाने काम सुरु आहे.

भारतातील उद्योगधंद्यांना होणार फायदा
भारत आणि बांगलादेश मध्ये द्विपक्षीय व्यापारी करार आहे. या अंतर्गत दोन्ही देशात मोठ्या प्रमाणात सामान निर्यात आणि आयात केले जाते. दोन्ही देशातील रस्ते आणि पाणी मार्गाचा वापर सामान आयात निर्यातीसाठी करार करण्यात आले आहे. यामुळे भारतातील उद्योगपती देशातील सामान बांगलादेशाबरोबरच जलमार्गाने म्यानमार आणि इतर देशांना पाठवू शकतात. आता ब्रम्हपुत्र नदीमार्ग भारत बांगलादेशाशी जोडला आहे. यामुळे भारतीय व्यापारी आपले सामान कमी खर्चात आणि लवकर दुसऱ्या देशात पाठवू शकतात. यामुळे भारतीय व्यापाऱ्यांना फायदा होईल. २०१८ मध्ये भारत-बांगलादेशाचा व्यापार ९.३ बिलियन डॉलर, म्हणजे ६३ हजार कोटी रुपये होता.

आरोग्यविषयक वृत्त –

सतत सर्दी होणं म्हणजे ‘या’ आजाराचा धोका, वेळीच ओळखा अन् अशी काळजी घ्या

केसांना कलरिंग करताना ‘या’ ४ गोष्टींची जरूर काळजी घ्या

सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर, ‘हे’ 7 महत्वाचे फायदे होतात, जाणून घ्या

जांभळातील पोषक तत्वे शरीराच्या ‘या’ 3 भागांना ठेवातात निरोगी, जाणून घ्या सर्वकाही

पाय थंड पडणे, सूज येणे ही गंभीर समस्या, वेळीच ‘हे’ उपचार करा

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

सूर्यफुलाच्या बियांपासून ‘हे’ फायदे तर भोपळ्याच्या बिया ‘या’ ४ गोष्टींसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

स्त्रीयांप्रमाणेच पुरुषांनाही येतो ‘मेनोपॉज’, तुम्हाला माहित आहे का ?

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या