India Lockdown | कोरोनाच्या टाळेबंदीची दाहकता दाखवणाऱ्या ‘इंडिया लॉकडाऊन’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मध्यंतरीच सई ताम्हणकरचा (Sai Tamhankar) एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) वायरल होत होता. हा फोटो ‘इंडिया लॉकडाऊन’ (India Lockdown) या चित्रपटाच्या सेटवरील असल्याचे सांगण्यात येत होते. तर आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. कोरोनामुळे देशभरात लागू झालेल्या टाळेबंदी (Lockdown Of Corona) वर आधारित हा चित्रपट आहे. हा चित्रपट ‘झी 5’ या ओटीटी वाहिनीवर दोन डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांमध्ये टाळेबंदीच्या काळात नागरिकांना झालेला त्रास दाखवण्याचा प्रयत्न लेखक दिग्दर्शकांनी केला आहे. (India Lockdown)

 

मार्च 2020 मध्ये देशात कोरोनाचे संकट आल्यामुळे केंद्र सरकारने 21 दिवसांचा लॉकडाऊन (India Lockdown) जाहीर केला होता. मात्र 21 दिवस हळूहळू वाढत गेल्याने आणि कोरोनाच्या भीतीमुळे मजूर शहरातून पायी आपापल्या गावी जाऊ लागले होते. हातावर पोट असलेल्या अनेकांवर उपासमारीचे संकट देखील कोसळले होते. तर अनेकांना आपली नोकरी देखील गमवावी लागली होती. या सर्व घटना या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहेत.

 

दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांनी यापूर्वी देखील ‘चांदणी बार’ (Chandni Bar),
‘ट्राफिक सिग्नल’ (Traffic Signal), ‘फॅशन’ (Fashion) आदी चित्रपटांमधून समाजातील घडणाऱ्या घटकांवर प्रकाश टाकला आहे.
तर पुन्हा एकदा ‘इंडिया लॉकडाऊन’ (India Lockdown) चित्रपटाच्या माध्यमातून टाळेबंदीच्या काळामधील वास्तव प्रेक्षकांसमोर ते घेऊन येणार आहेत.
या चित्रपटात सई ताम्हणकर (Sai Tamhankar), प्रतीक बब्बर (Prateik Babbar), श्वेता बासू प्रसाद (Shweta Basu Prasad),
अहाना कुमार (Ahan Kumar), प्रकाश बेलावेदी (Prakash Belawadi) यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

 

Web Title :- India Lockdown | the trailer of the film india lockdown based on the lockdown of corona has been released mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kantara OTT Release | बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा कांतारा सिनेमा ‘या’ दिवशी होणार OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज

Marathi Actor Mohan Joshi | अभिनेते मोहन जोशी पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या भूमिकेत; ‘या’ मालिकेत होणार एन्ट्री

Pune Crime | मार्केटयार्ड येथे गोळीबार करुन दरोडा घालणाऱ्या 3 फरार आरोपींना पिस्टलसह अटक, गुन्हे शाखा युनिट-3 ची कारवाई