भारताने मालिका गमावली 

साऊथम्पटन : वृत्तसंस्था 

इंग्लंडने भारत विरुद्धचा चौथा कसोटी क्रिकेट सामना जिंकून पाच सामन्यांची मालिका ३-१  फरकाने जिंकली . विजयासाठी मिळालेल्या २४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना  १८४ धावांतच भारतीय संघ तंबूत परतला.

[amazon_link asins=’B07BCYJQQK,B07D1Z5625′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’eeb33d64-af3d-11e8-a3ee-db7921484218′]

इंग्लंडने भारताला  २४५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. अवघ्या ४ धावांवर लोकेश राहुल बाद झाला.  त्यानंतर आलेला पुजाराही अँडरसनच्या  चेंडूवर पायचीत झाला. भारताच्या २२ धावा झाल्या असताना अँडरसनने भारताचा दुसरा सलामीवीर शिखर बाद केला . भारताचे तीन फलंदाज बाद झाल्यावर कर्णधार विराट आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांच्याकडे  धुरा आली. हे आव्हान स्विकारत त्यांनी झुंजार फलंदाजी करण्यास सुरुवात केली. कर्णधार विराट कोहलीने झुंजार अर्धशतक करत अजिंक्यबरोबर १०० धावांची भागिदारी केली. पहिल्या डावात भारताचा निम्मा संघ माघारी धाडणाऱ्या मोईन अलीने भारताला दुसऱ्या डावातही धक्के दिले त्याने विराट रहाणे यांची  जोडी फोडत भारताच्या चार फलंदजांना बाद  केले  त्याने चौथ्या कसोटीत तब्बल ९ बळी घेतले .

 विराट व अजिंक्य रहाणे  बाद झाल्यानंतर सामना भारताच्या हातातून निसटला.भारताकडून  मोहम्मद शमीने सर्वाधिक ४ बळी टिपले. इशांत शर्माने २ तर रविचंद्रन अश्विन व जसप्रीत बुमराह यांनी १-१ गडी बाद केला. इंग्लंडने भारताचा दुसरा डाव १८४  धावांत गुंडाळून  चौथ्या कसोटीत ६०  धावांनी विजय मिळवला . इंग्लंडने ही कसोटी जिंकून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.

इंग्लंडच्या भूमीवर भारतीय संघाला गेल्या १० वर्षांपासून मालिका विजय मिळविता आलेला नाही. शेवटचा मालिका विजय २००७  मध्ये १-०  असा मिळाला होता.