COVID-19 Death : भारतात जूनपर्यंत कोविड-19 मुळे रोज ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू होण्याचा अंदाज, लान्सेटचा खळबळजनक रिपोर्ट

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  जर कोरोना व्हायरसचा प्रसार तात्काळ रोखण्यासाठी योग्य पावले उचलली गेली नाहीत तर परिणाम भीषण असू शकतात. लान्सेट कोविड-19 कमीशनच्या रिपोर्टमध्ये याबाबत खळबळजनक अंदाज वर्तवण्यात आला आहे. रिपोर्टच्या प्राथमिक पुनरावलोकनानुसार, भारतात कोरोना व्हायरसशी संबंधीत 1,750 मृत्यू रोज होऊ शकतात आणि आकडा वाढून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 2,320 वर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगढ, कर्नाटक, दिल्ली, तमिळनाडु, उत्तर प्रदेश आणि गुजरात सर्वात वाईटप्रकारे प्रभावित होणारी राज्य आहेत. रिपोर्टचे शीर्षक आहे, ’भारतातील दुसर्‍या कोविड-19 लाटेचे नियंत्रण’. रिसर्चमधून हे सुद्धा संकेत मिळतात की, दुसरी लाट भौगोलिकदृष्ट्या अजूनपर्यंत बांधली गेली आहे.

असिम्पटोमॅटिक प्रकरणे वाढवत आहेत महामारी

दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा दोन महत्वाच्या पद्धतीने वेगळी आहे. अगोदर, कोरोना व्हायरसच्या नवीन प्रकरणांमधील वाढ खुप जास्त होती. फेब्रुवारीपासून रोज नवीन 10,000 प्रकरणे वाढून एप्रिलपर्यंत 80,000 वर येण्यास 40 दिवसांपेक्षा कमी दिवस लागले. तर मागील वर्षी सप्टेंबरमध्ये 83 दिवस लागले होते. आता, कोरोना व्हायरसची प्रकरणे असिम्टोमॅटिक किंवा हलक्या लक्षणांची आहेत, जी हॉस्पिटलमध्ये भरती होणे आणि मृत्युच्या कमी दरासाठी तुलनात्मक दृष्ट्या कारण ठरत आहेत. हे पूर्णपणे स्पष्ट नाही की, असिम्पटोमॅटिक प्रकरणांचे उच्च प्रमाण केवळ काँटॅक्ट ट्रेसिंग, उदाहरणार्थ जास्त कौटुंबिक सदस्यांची तपासणीमुळे केले जात आहे.

हे उपाय करण्याची आवश्यकता

* ट्रान्समिशन चेन तोडणे सर्वात महत्वाचे

* कठोर उपाय करणे काळाची गरज

* मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्याची आवश्यकता.