मोदी सरकारसाठी चिंताजनक बातमी ! प्राप्तिकर संकलनात 20 वर्षात प्रथमच घट होण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारला मिळत असणारा कॉर्पोरेट आणि प्राप्तिकर हा प्रथमच २० वर्षात घटण्याची शक्यता आहे असे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे. सरकारनं कार्पोरेट कपात केली कारण विकास दरात घसरण झाली आहे. कर संकलनावर त्याचा परिणाम होत आहे.

सरकारला आशा होती की मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षात कराच्या माध्यमातून १३.५ लाख कोटी रुपयांचं उत्पन्न मिळेल. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत यंदा थेट कराच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नात १७ टक्क्यांची वाढ सरकारला अपेक्षित होती. मात्र गेल्या वर्षभरापासून अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असल्याने मागणीत मोठ्या प्रमाणात घट झाली आणि याचा थेट परिणाम नोकऱ्यांवर आणि गुंतवणुकीवर झाला आहे. म्हणूनच कर संकलनात घट पाहायला मिळत आहे.

एक वरिष्ठ अधिकाऱ्यानं माहिती दिली की, गेल्या वर्षी याच दिवसापर्यंत कर विभागानं ५.५ टक्क्यांनी जास्त रक्कम वसूल केली होती, मात्र या वर्षी कर विभागाला २३ जानेवारीपर्यंत केवळ ७.३ लाख कोटी रुपयेच वसुली करण्यात यश आलं आहे. आकडेवारी सांगते की, पहिल्या तीन महिन्यांमध्ये कंपन्यांकडून आगाऊ स्वरुपात कर गोळा केल्यानंतर शिल्लक राहिलेल्या शेवटच्या तीन महिन्यांत वार्षिक कराच्या ३० ते ३५ टक्के रक्कम जमा होते. गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीत हे अधोरेखित करण्यात आलं आहे.

कर वसुलीसाठी खूप प्रयत्न करून देखील यंदाच्या वर्षातील थेट कर संकलन हे ११.५ लाख कोटींच्या खालीच राहिले आहे. तसेच गेल्या वर्षी थेट करातून ११.५ लाख कोटी रुपये मोदी सरकारला मिळाले होते. यामध्ये या वर्षी १७ टक्क्यांची वाढ होईल अशी आशा सरकारला होती. त्याप्रमाणे उद्दिष्ट निश्चित देखील करण्यात आलं होतं. मात्र प्रथमच २० वर्षांत सरकारला थेट करातून मिळणारं उत्पन्न कमी होणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like