‘कोरोना’ लसीकरणात भारताने केला नवा रेकॉर्ड, एका दिवसात 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना दिली गेली व्हॅक्सीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना महामारीविरूद्ध कार्यवाही युद्धस्तरावर जारी आहे. 1 मार्चला केंद्र सरकारने कोरोनावर मोठा वार केला, जिथे दुसर्‍या टप्प्यातील अभियानाला सुरूवात झाली. या अभियानासाठी गुरुवारचा दिवस खुप खास ठरला, या दिवशी एका दिवसात 10 लाखपेक्षा जास्त लोकांना लस देण्यात आली, जो एक विक्रम असल्याचा दावा करण्यात आला आहे. तर आतापर्यंतच्या एकुण आकड्यांचा विचार केला तर 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरण अभियानात 1.77 कोटी डोस दिले गेले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशभरात कोरोनाविरूद्ध लसीकरण अभियान वेगाने सुरू आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 10 हजार सरकारी सेंटर सहभागी आहेत. याशिवाय प्रायव्हेट हॉस्पीटलमध्ये सुद्धा व्हॅक्सीन दिली जात आहे. ज्यासाठी 250 रुपयांचे शुल्क जनतेकडून घेतले जात आहे. प्रायव्हेट आणि सरकारी भागीदारीमुळे गुरुवारी नवा रेकॉर्ड झाला, या एका दिवसात 10 लाखांपेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सीन दिली गेली. सध्या ज्येष्ठ आणि गंभीर आजाराने ग्रस्त लोकांना व्हॅक्सीन दिली जात आहे. यानंतर तरूणांचा नंबर येईल.

24 तासात किती नवीन केस
तर मागील 24 तासात एकुण 17,407 नवीन कोरोना केस नोंदल्या गेल्या आहेत. ज्यामुध्ये महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमिळनाडु, गुजरात आणि कर्नाटकमध्ये 85.51 टक्के नवीन केस समोर आल्या. सध्या महाराष्ट्र सर्वात जास्त प्रभावित राज्य आहे, येथे 9855 नवीन प्रकरणे समोर आली. ही 18 ऑक्टोबरनंतरची सर्वात मोठी संख्या आहे, त्या दिवशी 10259 केस समोर आल्या होत्या. यानंतर केरळमध्ये 2765 आणि पंजाबमध्ये 772 नवी प्रकरणे समोर आली.