अयोध्येत हिंदू-मुस्लीम ‘भाई-भाई’ ; मुस्लिम दफनभूमीसाठी हिंदूंचे ‘भूदान’

अयोध्या : झारखंडमध्ये जमावाने मुस्लिम तरुणाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडवणारी घटना प्रभू श्रीरामचंद्राच्या अयोध्या नगरीजवळ घडली आहे.येथील गोसाईगंज गावातील हिंदूंनी सव्वा गुंठा जमीन मुस्लिमांच्या दफनभूमीसाठी दान केली आहे.

गोसाइगंज गावात मुस्लिमांची लहान दफनभूमी आहे. या दफनभूमीच्या शेजारील १.२५ गुंठा जमीन हिंदूंच्या मालकीची होती. पण दफनभूमीतील जागा अपुरी पडू लागल्यामुळे काही वर्षांपूर्वी या हिंदूंच्या जमिनीवर मुस्लिम बांधवांनी दफनविधी करण्यास सुरुवात केली होती. यावरून हिंदू-मुस्लिमांमध्ये थोडा वादही झाला. यामुळे जमिनीचा प्रश्न चिघळला होता.

पण आता दोन्ही समाजांनी सांमजस्याने हा तिढा सोडवला आहे. दफनभूमीसाठी स्थानिक हिंदूंनी सव्वा गुंठा जमीन दान केली असून यामुळे हिंदू-मुस्लिमांमधील ऐक्य अधिक मजबूत होण्यास मदत होईल, आशावाद व्यक्त केला जातो आहे. भाजप आमदार इंद्रप्रताप तिवारी यांनी याप्रकरणी पुढाकार घेत हिंदू बांधवांना भूदान करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर राम प्रकाश बबलू, सूर्य कुमार झिंकान, राम शब्द, राम सिंह पांडे, जिया राम,सुभाष चंद्रा ,रिता देवी, विंध्याचल आणि अवधीश पांडे या सर्वांनी आपली जमीन दफनभूमी समितीला हस्तांतरित केली आहे. जमिनीच्या नवीन मालकांची माहिती लवकरच महसूल विभागात नोंदवली जाणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त

संधिवाताच्या रुग्णांना कोणते खाद्यपदार्थ ठरू शकतात फायदेशिर, जाणून घ्या

समस्या चुटकीसरशी घालवणाऱ्या घरगुती उपायांमागील विज्ञानही माहिती हवे

आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर घरच्याघरी होऊ शकतात उपाय

हेअर ड्रायरचा अतीवापर ‘केसां’साठी धोकादायक