जम्मू काश्मीरच्या राष्ट्रपती राजवटीतबाबत केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षीपासून जम्मू काश्मीरमध्ये लागू असलेल्या राष्ट्रपती राजवटीबाबत काल केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला. जम्मू काश्मीरमधील असलेली राष्ट्रपती राजवट आणखी ६ महिन्यांसाठी वाढवण्यासाठी मंजूरी दिली आहे. हा निर्णय येत्या ३ जुलैपासून लागू होईल. जून २०१८ पासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे पुढे ती लागू ठेवावी कि केंद्रीय मंत्रीमंडळाच्या काळ पार पडलेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे ती आणखी सहा महिने वाढवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीनंतर काश्मीरसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बातमीला दुजोरा दिला. त्याचबरोबर एका केंद्रीय अधिकाऱ्याने याबद्दल माहिती देताना सांगितले कि, मंत्रिमंडळाच्या मंजूरीनंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणाऱ्या घोषणापत्रावर हस्ताक्षर करतील जे तीन जुलैपासून लागू होणार आहे.

दरम्यान, त्याचबरोबर याव्यतिरिक्त केंद्र सरकारनं आधार आणि इतर कायदा (सुधारणा) विधेयक, २०१९ मध्ये मंजुरी दिली आहे. आता कोणत्याही व्यक्तिला आधार क्रमांक प्रदान करण्यास भाग पाडले जाऊ शकणार नाही आहे. त्याचबरोबर तिहेरी तलाकवर देखील केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर जम्मू कश्मीर आरक्षण विधेयकाला देखील या मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त –

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

कोल्हापूरचं हृद्य धडधडतंय पुण्यात

हाताला ६ बोटे असणे असते फायद्याचे

मेकअप रिमूव्ह करुन झोपा नाहीतर त्वचेला होईल नुकसान

You might also like