आता देशाचे जे होईल त्याचा ‘दोष’ आपण इंग्रजांना देऊ शकत नाही : मोहन भागवत

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत यांनी म्हटले की, आता आपला देश स्वतंत्र आहे आणि आपल्याला देशाचे संरक्षण करायचे आहे. सोबतच सामाजिक सद्भावना कायम ठेवायची आहे. कारण आता जे काही चांगले-वाईट होईल, त्यामध्ये आपले योगदान असणार आहे. यासाठी आपण इंग्रजांना दोष देऊ शकत नाही.

नव-उत्सव 2020 कार्यक्रमात त्यांनी म्हटले की, संविधान प्रदान करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन भाषणे केली होती. त्यांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता, तो हाच आहे. आपल्या देशाचे जे होईल, त्यास आपणच जबाबदार असणार आहोत. कारण आता देश आपल्या हातात आहे.

काही राहून गेले, उलट-सुलट झाले तर इंग्रजांना दोष देऊ शकत नाही. शिस्त आणि सामाजिक शिस्त समजाच्या भल्यासाठी महत्वपूर्ण आहे. आपल्याला देशभक्तीसह सामाजिक शिस्त पाळावी लागेल, यासंबंधी स्वातंत्रपूर्व काळात आपल्याला भगिनी निवेदिता यांनी सावधदेखील केले होते.

भागवत म्हणाले, आपल्याला समाज एकसंघ करण्याची गरज आहे आणि एका अशा भारताची निर्मिती करायची आहे, जो जगाला मानवता प्रदान करेल.