Novavax सीरम इन्स्टिट्यूटसोबत Covid-19 लसीचं उत्पादन करणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Novavax कंपनीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत किविड 19 लस उत्पादन करार जाहीर केला आहे. Novavax ने प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 2021 मध्ये NVX-CoV2373 चे एक अब्ज डोस तयार करणार आहे. ऑगस्टमध्ये Novavax ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे.

Novavax ने लस उत्पादक सीरम संस्थेबरोबर एक अब्ज डोस तयार करण्यासाठी कारारावर स्वाक्षरी केली आहे. आता विस्तारीत कराराच्या दृष्टीने सीरम इन्स्टिट्यूट या लशीतील अँटिजन घटक तयार करेल. अमेरिकन कंपनी Novavax लसीची चाचणी मधल्या टप्प्यात आहे. प्राथमिक टप्प्याच्या चाचणीनंतर असे आढळले की, त्यात कोरोना व्हायरस विरुद्ध मोठ्या प्रमाणात अँटिबॉडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे ही लस येत्या काळात कोरोना सारख्या साथीवर मात करण्यासाठी महत्त्वाची ठरु शकते.

दरम्यान, जगभरात कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असताना कोरोना विरुद्धची लस कधी उपलब्ध होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. काही कंपन्यांनी असा दावा केला आहे की या वर्षात कोरोनावरील लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. तर काहींनी लस पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला उपलब्ध होईल असा दावा केला आहे. तर सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील लस 2024 च्या शेवटी सर्वांना उपलब्ध होईल असं म्हटलं आहे.