भारत टॉप-15 कोरोना संक्रमित देशांच्या लिस्टमधून पडला बाहेर, रोज होणार्‍या मृत्यूंमध्ये सुद्धा घसरण

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या प्रकरणात भारतासाठी (india ) एक चांगली बातमी आहे. भारतात (india ) कोरोनाची प्रकरणे हळुहळु कमी होत आहेत. दररोज येणार्‍या नवीन प्रकरणांमध्ये घसरण होत आहे. भारत आता त्या टॉप-15 संक्रमित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे, जिथे कोरोनामुळे दररोज खुप जास्त मृत्यू होत आहेत.

भारतात मागील चोवीस तासात दररोज होणार्‍या मृत्यूंमध्ये सुद्धा घट नोंदली गेली आहे. जर मागील 11 दिवसांचे आकडे पाहिले तर देशभरात 200 पेक्षा कमी मृत्यू झाले आहेत. मृत्यू कमी होण्याच्या बाबतीत भारत आता 16 वरून 20व्या नंबरवर आहे. कोरोनामुळे अमेरिकेत अजूनही सर्वात जास्त मृत्यू होत आहेत. शनिवारी अमेरिकेत कोरोनामुळे 3,427 लोकांचा मृत्यू झाला होता.

अमेरिकेनंतर मेक्सिकोत सर्वात जास्त मृत्यू
अमेरिकेनंतर मृत्यूच्या प्रकरणांमध्ये मेक्सिकोचा दुसरा नंबर आहे. येथे शनिवारी 1,440 लोकांचा संसर्गामुळे मृत्यू झाला. तर युकेमध्ये 1,348 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तसेच ब्राझीलमध्ये 1,176 लोकांचा जीव गेला होता. या सर्व देशांमध्ये दररोज हजारपेक्षा जास्त लोक आपला जीव गमावत आहेत.

प्रत्येक 100 पैकी 5-6 लोक सापडत आहेत संक्रमित
भारतात जर कोरोना टेस्टबाबत बोलायचे तर 19 कोटीपेक्षा जास्त लोकांनी टेस्ट केली आहे. आता केवळ 100 लोकांमध्ये 5-6 लोक संक्रमित आढळत आहेत. आज देशात 12 हजार 890 नवीन कोरोना रूग्ण समोर आले. तर 12 हजार 518 लोक बरे झाले. तर संसर्गामुळे 125 लोकांचा मृत्यू झाला आहे.