निराशाजनक ! जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली देशांच्या यादीतून भारत OUT

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – चालू वर्षातील जागतिक सामर्थशाली देशाची यादी जाहीर झाली असून यातून भारत बाहेर पडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यादीत अमेरीका पहिल्या क्रमांकावर आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे भारताचे ( भारत ) दोन गुण कमी झाले आहेत. सीडनीतल्या लोवी इन्स्टिट्युटने या संदर्भातील आकडेवारी प्रसिध्द केली आहे.

लोवी इन्स्टिटयुटच्या आशिया पॉवर इंडेक्सनुसार, 2019 मध्ये भारताला 41 गुण होते. त्यात आता घट झाली असून यंदा भारताला 39.7 गुण मिळाले आहेत. 40 किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या देशानाच सामर्थशाली देशाच्या यादीत स्थान मिळत. मात्र यंदा भारताचा या यादीतील समावेश काही गुणांमुळे थोडक्यात हुकला आहे.

आशियातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्येचा देश आता मध्य सामर्थशाली देशाच्या यादीत झाल्याच लोवी इन्स्टिटयुटने अहवालात म्हणल आहे. येत्या काही वर्षात भारताचा समावेश पुन्हा सामर्थशाली देशाच्या यादीत होऊ शकेल. इँडो फॅसिफिक येणारा भारत कोरोनामुळे आपली विकासाची क्षमता हरवून बसला आहे, असे लोवी इन्स्टिटयुटने अहवालाद नमूद केले आहे.

चीनच्या तुलनेत भारत पिछाडीवर
भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास समान आहे. काही वर्षात भारत चीनला लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकू शकेल. मात्र कोरोना संकटामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत भारत चीनचे आर्थिक उत्पादन केवळ 40 टक्क्यापर्यंत पोहचेल असे लोवी लोवी इन्स्टिटयुटने अहवालात नमूद केले आहे.