विंग कमांडर अभिनंदनच्या सुटकेबाबत पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांचं मोठं वक्तव्य

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – भारत -पाक यांच्यात सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. भारतीय वायुसेनेचा विंग कमांडर अभिनंदन सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याच्या सुरक्षित सुटकेसाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशातच “परिस्थितीतून तोडगा निघावा अशी आमची इच्छा आहे , वातावरण निवळले की आम्ही ताब्यात घेतलेल्या भारतीय वैमानिकाला सोडण्याचा विचार करू” असे महत्वपूर्ण विधान पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी केले आहे.

पाकिस्तानने बुधवारी भारतीय वैमानिक अभिनंदनला ताब्यात घेतले आहे. त्यांची सुरक्षित सुटका व्हावी अशी मागणी भारताने केली आहे. तसेच पाकिस्तानी मीडियाने आणि लष्कराने ज्या पद्धतीने त्या जखमी पायलटचा व्हिडीओ प्रसिद्ध केला त्यावर देखील परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला आहे.

भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानच्या F-16 या विमानाला पिटाळून लावताना भारताचं MiG-21 हे लढाऊ विमान कोसळलं होतं. विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हा त्या विमानाचा पायलट होता. विमान कोसळल्यानंतर तो पाकिस्तानच्या हद्दीत उतरला आणि त्याला पाकिस्तानने ताब्यात घेतलं.

अभिनंदनचा व्हिडीओ व्हायरल – सोशल मीडियावर मिग -२१ या भारतीय विमानाचा वैमानिक अभिनंदन यांचा व्हिडीओ देखील पाकिस्तान कडून व्हायरल करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.या व्हिडिओ मध्ये भारतीय वैमानिक जखमी अवस्थेत दिसून येत होते. आंतरराष्ट्रीय करारानुसार अशा पायलटला योग्य वागणूक दिली जावी असा नियम आहे. त्याला संबंधीत देशाच्या स्वाधीन करावं असंही त्या करारामध्ये म्हटलं आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानकडे ती मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या –

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग, समझोता एक्सप्रेस रद्द 

लोकसभा निवडणूक : माढ्यातून शरद पवारांच्या विरोधात राजू शेट्टी रिंगणात ? 

पकडलेले ‘ते’ 2 डंपर, 1 ट्रॅक्‍टर गायब ; प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर