युद्ध झाल्यास भारतासमोर किती वेळ टिकेल पाकिस्तान ? जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर संपूर्ण जगात भारताला बदनाम करण्याचे षडयंत्र फेल ठरल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आता भारताला अण्वस्त्र युद्धासाठी धमकी देत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तीन वेळा विधान केले आहे की,’युद्ध झाल्यास जग नष्ट होईल कारण पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत.’ ग्लोबल फायर पॉवर इंडेक्समध्ये समाविष्ट असलेल्या जगातील १३७ देशांपैकी, भारतीय सैन्य जगातील चौथे सर्वात शक्तिशाली सैन्य आहे. सैनिकांच्या संख्येच्या बाबतीत, भारतीय लष्कर जगातील दुसर्‍या क्रमांकाची सैन्य आहे.

जर आपण पाकिस्तानची तुलना केली तर त्याचे सैन्य जगातील पंधराव्या क्रमांकावर असून भारताकडे १३,६२,५०० सक्रिय सैनिक आहेत तर पाकिस्तानकडे ६,३७,००० सैनिक आहेत. आकडेवारीची तुलना केल्यास पाकिस्तानच्या धमकीतील पोकळपणा तुमच्या सहज लक्षात येईल. जाणून घेऊयात दोन्ही देशांच्या सामर्थ्याविषयी आकडेवारीच्या साहाय्याने –

भारताकडे २०८२ लष्करी विमाने आहेत तर पाकिस्तानकडे १३४२ विमाने आहेत.

भारताकडे ५२० लढाऊ आणि इंटरसेप्टर विमान आहेत तर पाकिस्तानकडे फक्त ३४८ विमान आहेत

भारताकडे ६९४ अ‍ॅटॅक एअरक्राफ्ट हल्ले विमाने आहेत तर शत्रू देश पाकिस्तानकडे ४३८ आहेत

भारताकडे २४८ परिवहन विमान (ट्रांसपोर्ट एयरक्राफ्ट) आहेत तर पाकिस्तानकडे ५१ आहेत.

भारताकडे ६९२ हेलिकॉप्टर आहेत तर कंगाल पाकिस्तानकडे ३२२ हेलिकॉप्टर आहेत.

भारताकडे ३४६ सेवायोग्य विमानतळ आहेत, तर पाकिस्तानकडे फक्त १५१ विमानतळ आहेत.

भारताकडे ४४२६ टँक (राणगाडे) आहेत तर पाकिस्तानकडे २१८२ टँक आहेत.

नौदल सैन्य उपकरणाच्या संख्येतही भारत पुढे आहे, भारताकडे २९५ आणि पाकिस्तानकडे १९७ उपकरणे आहेत.

भारताकडे विमानवाहू जहाज आहे तर पाकिस्तानकडे विमानवाहू जहाज नाही.

भारताकडे १६ पाणबुड्या आहेत तर पाकिस्तानकडे फक्त ५ पाणबुड्या आहेत.

तसे पाहता , भारतासमोर उभे राहणे सोपे नाही, हे पाकिस्तानलाही ठाऊक आहे त्यामुळे तो दहशतवादाचा वापर करत आहे. पाकिस्तानच्या दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने सागरी पथक स्थापन केले असल्याची माहिती भारताच्या नौदलाचे प्रमुख करंबीर सिंह यांनी दिली आहे. अशा हल्ल्यांचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे. सीमेवरही पाकिस्तानच्या कारवायांवर नजर ठेवली जात आहे. अलीकडेच चीन आणि पाकिस्तानने लडाख सीमेजवळ संयुक्त सैन्य सराव केले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –