भारत – पाकिस्तान वाद मिटवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करणार : डोनाल्ड ट्रम्प 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत – पाकिस्तानचा वाद सध्या शिगेला पोहंचला आहे. रशिया, अमेरिकेसारख्या देशांनीही भारताला पाठिंबा दिला आहे. दरम्यान भारत आणि पाकिस्तान मधील वाद मिटवण्यासाठी अमेरिका मध्यस्ती करणार असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हंटले आहे.
https://twitter.com/ANI/status/1101052122244833280
गुरुवारी ( १४ फेब्रुवारी ) दुपारी जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या बसवर  २०० किलो स्फोटकांनी भरलेली कार दहशतवाद्यांनी आदळली. यादरम्यान ४४ जवान शाहिद झाले. विशेष म्हणजे, लष्करावर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. यामुळे, भारत – पाकिस्तानचा वाद सध्या शिगेला पोहंचला आहे. दरम्यान या दहशतवादी हल्ल्याला भारताने एअर स्ट्राइक करून उत्तर दिले. भारतीय वायुसेनेच्या मिराज २०००’च्या १२ लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेच्या तळांवर १००० किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास ३५० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तानदरम्यान वाढता तणाव पाहता. अमेरिकेने भारत पाकिस्तानचा वाढता वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  प्रयत्न करणार आहेत.
विशेष म्हणजे,  भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेले तणावाचे वातावरण लवकरच संपुष्टात आले पाहिजे. त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. मला आशा आहे की दोन्ही देशांमधील तणाव लवकरच निवळेल, अनेक वर्षांपासूनचा असलेला हा वाद लवकर मिटवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.