राष्ट्रीय तपास यंत्रणेला मिळणार ‘हा’ अधिकार, ताकद वाढणार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज लोकसभेत राष्ट्रीय तपास यंत्रणा (सुधारणा) विधेयक मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील दहशतवादाला आळा घालण्यासाठी मदत होणार आहे. या विधेयकाला मंजुरी मिळाल्याने ‘एनआयए’ला आता परदेशातही दहशतवादी हल्ल्यांसदर्भातील तपास करण्याचे अधिकार मिळाले आहेत. त्यामुळे देशासाठी बातमी महत्त्वाची आहे. मोदी सरकार कधीही या कायद्याचा गैरवापर करणार नाही, अशी हमी गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी दिली आहे.

देशातून दहशतवाद संपवण्यासाठी हा कायदा गरजेचा आहे. हा कायदा आमलात आणल्याने ‘एनआयए’ला आता परदेशातही दहशतवादी हल्ल्यांसदर्भातील तपास करण्याचे अधिकार मिळणार आहेत. तसंच मोदी सरकार या कायद्याचा गैरवापर करणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे.

याच मुद्द्यावर लोकसभेत आज अमित शहा आणि एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवोसी यांच्या शा‍ब्दिक चकमक झाली. यावेळी सरकारची बाजू सत्यपाल सिंह हे मांडत होते. तेव्हा त्यांनी मुंबईने दहशतवादाला खूप सहन केले आहे, कारण मुंबईत नेहमीच राजकीय चश्म्यातून दहशतवाद पाहिला गेला. तसेच, हैदराबाद बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी काही संशयित अल्पसंख्यांक समुदायाच्या नागरिकांना ताब्यात घेतले. त्यावेळी, चक्क मुख्यमंत्र्यांनी तसे न करण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे पोलीस आयुक्तांना नोकरीवरुन काढून टाकण्यापर्यंतही सुनावण्यात आल्याचे, म्हटले.

त्यावर सत्यपाल सिंह यांच्या वक्तव्यावर असुदुद्दीन औवेसी यांनी आक्षेप घेत यासंदर्भात सत्यपाल सिंह यांनी पुरावे द्यावेत, अशी मागणी केली. तसच त्यांचे भाषण थांबविण्याचा प्रयत्नही केला. तेव्हा अमित शहा यांनी उठून औवेसी यांना शांत करण्यासाठी तुम्हाला ऐकून घ्यायची सवय लावावी लागेल. जेव्हा दुसरं कोणी बोलत तेव्हा तुम्ही ऐकून घेता, पण सत्यपालजी बोलतात तेव्हा तुम्ही मध्येच बोलत राहता. तुम्हाला ऐकायची सवय लावावी लागेल, असंही अमित शहा यांनी म्हटले आहे.

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही