…म्हणून पेट्रोल – डिझेलचे दर वाढले, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम पुन्हा भारतातील पेट्रोल-डिझेलवर होताना दिसत आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई मध्ये मंगळवारी पेट्रोल 5 पैसे प्रति लिटरने वाढलं आहे. याशिवाय दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईमध्ये डिझेलचे दर 11 पैशांनी वाढले आहेत. मुंबईत डिझेल 12 पैशांनी वाढलं आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, दिल्लीत पेट्रोल 75.74 आणि डिझेल 68.79 रुपये प्रतिलिटर झालं आहे. मुंबईत पेट्रोल 81.33 तर डिझेल 72.14 प्रतिलिटर झालं आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 78.69 आणि डिझेल 72.69 रुपये प्रतिलिटर झालं आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोल 78.33 तर डिझेल 71.15 रुपये प्रति लिटर आहे.

इराण-अमेरिकेतल्या वाढत्या तणावाचा भारतावर परिणाम होताना दिसत आहे. या तणावामुळे कच्च्या तेलाचा आयात खर्च वाढला आहे. त्या वाढत्या खर्चामुळे घरगुती बाजारात इंधनाची किंमत वाढली आहे. भारतात कच्च्या तेलाच्या आयातीसाठी लागणारा खर्च 51 हजार कोटींहून अधिक वाढण्याची शक्यता आहे.

आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावामुळे गेल्या आठवड्याभरापासून केवळ इंधनच नाही तर सोन्याच्या किंमतीही वाढताना दिसत आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये इंधनाचे दर कमी होतील याची शक्यता कमी आहे. तज्ज्ञांनीही असाच अंदाज वर्तवला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/