ज्यानं झाला होता इराणी कमांडर सुलेमानीचा ‘खात्मा’, अमेरिकेकडून ते खतरनाक शस्त्र खरेदी करणार भारत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पूर्व लडाखमधील लाईन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलवर (एलएसी) भारत आणि चीनमधील संघर्ष कायम आहे. आतापर्यंत दोन्ही देशांमधील बैठकीचा कोणताही निकाल लागलेला नाही. याच दरम्यान सीमेवर सध्याची परिस्थिती पाहता भारताने अमेरिकेकडून प्रीडेटर-बी ड्रोन खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. हा एक ड्रोन आहे जो केवळ गुप्त माहितीच देत नाही, तर एखाद्या क्षेपणास्त्र आणि लेझर गाईड बॉम्बनेही टार्गेटवर हल्ला करू शकतो. असे म्हटले जात आहे की, याचाच वापर करून अमेरिकेने इराणी कमांडर जनरल कासिम सुलेमानीला ठार केले होते.

अमेरिकेशी चर्चा सुरु
माहितीनुसार, अमेरिकेने भारताला ३०-सी गार्डियनची विक्री करण्याची ऑफर दिली आहे. त्याची किंमत सुमारे चार अब्ज डॉलर्स आहे. परंतु सीमेवरील सद्यस्थिती पाहता भारताला असे वाटत आहे की, सर्व्हिलन्स आणि टार्गेटवर हल्ल्यासाठी एकच ड्रोन वापरणे अधिक चांगले होईल आणि प्रीडेटर-बी ड्रोन हे दोन्ही काम करु शकते. या करारासाठी भारतीय नौदल आणि लष्कर दोघेही अमेरिकेशी चर्चा करत आहेत.

अमेरिकेला अडचण
असे म्हटले जात आहे की, अमेरिका भारताला प्रीडेटर-बी ड्रोन देण्यास तयार आहे, पण शस्त्र कराराच्या मुद्द्यावरून अमेरिका सध्या भारतावर थोडा नाराज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा का खरेदी केली याबाबत अमेरिका नाराज आहे. अमेरिकेला अशी भीती आहे की, पृष्ठभाग ते एअर क्षेपणास्त्र यंत्रणा भारतातून मॉस्को येथे पोहोचू शकते. चीनने आधीच रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र घेतले आहे.

भारताला याची आवश्यकता का पडली?
सध्या भारत लडाखमध्ये इज्राईली हेरॉन ड्रोन वापरत आहे. हे ड्रोन शस्त्रे नसलेले आहेत. तर चीनकडे विंग लूंग II ड्रोन आहे, ज्यामध्ये धोकादायक शस्त्रे आहेत. चीन हा ड्रोन पाकिस्तानला देण्यासही तयार आहे. पाकिस्तान हवाई दलाने चीनशी ४८ ड्रोनसाठी करार केला आहे. विंग लूंग II मध्ये १२ एअर-टू-सर्फेस क्षेपणास्त्रे आहेत. याचा उपयोग सध्या लिबियाच्या सिव्हिल युद्धात केला जात आहे.

काय आहे प्रीडेटर-बी ड्रोनचे वैशिष्ट्य?
प्रीडेटर-बीला एमयू-९ रीपर म्हणूनही ओळखले जाते. अमेरिका एअर फोर्सद्वारे याचा वापर केला जातो. हे ड्रोन शस्त्रासह लेझर गाईडेड एअर टू ग्राउंड हेलफायर क्षेपणास्त्रांननी सुसज्ज आहेत. जो अचूक निशाणा साधतो आणि आसपास खूपच कमी नुकसान करते. हे ४,७६० किलो वजनासह ताशी २३० किलोमीटर वेगाने उड्डाण करू शकते. या ड्रोनचा वापर पाळत ठेवण्यासाठी, शोधमोहीम आणि मदत-बचाव मोहिमांमध्येही केला जातो.