Corona Vaccine : शेजारी देशांमध्ये ‘कोरोना’ नष्ट करणार भारतीय व्हॅक्सीन, पाठवणार 2 कोटी डोस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने दोन स्वदेशी कोरोना व्हॅक्सीनला इमर्जन्सी वापराची परवानगी दिली आहे. व्हॅक्सीनला मंजूरी मिळाल्यानंतर देशभरात उद्या 16 जानेवारीपासून कोविड-19 व्हॅक्सीनेशनची सुरुवात होत आहे. तर जगाला सुद्धा कोरोना व्हॅक्सीनबाबत भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत. अनेक देश भारताकडून कोरोना व्हॅक्सीनचा पुरवठा मागत आहेत.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडची व्हॅक्सीन भारताचे शेजारी देश नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान, सेशेल्स आणि मॉरीशसला पाठवली जाईल. भारत आपल्या शेजारी देशांना व्हॅक्सीनचे 20 मिलियन डोस सप्लाय करणार आहे.

काही देशांना दिली जाईल मोफत व्हॅक्सीन
जाणकारांचे म्हणणे आहे की, शेजारी देशांना व्हॅक्सीन पाठवण्याच्या योजनेवर सध्या चर्चा सुरू आहे. काही देशांना व्हॅक्सीनचा पुरवठा मोफत सुद्धा केला जाऊ शकतो, जेणेकरून शेजारी देशांची मदत केली जाईल. त्यांनी म्हटले की, कोरोना व्हॅक्सीनची पहिली बॅच पुढील दोन आठवड्यात पाठवली जाईल. शेजारी देशांना व्हॅक्सीन दिल्यानंतर भारत सरकार लॅटिन अमेरिका, अफ्रीका आणि पूर्व सोव्हिएट गणराज्यांच्या देशांना लस सप्लाय करेल.

ब्राझीलने सुद्धा 20 लाख डोसची केली मागणी
ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी भारतात तयार झालेल्या कोविशिल्डच्या 20 लाख व्हक्सीन पाठवण्याची विनंती केली आहे. ही व्हॅक्सीन पुण्यातील सीरम संस्थेने बनवली आहे.

12 ते 14 देशांना हवी आहे भारतीय व्हॅक्सीन
सुमारे 12-14 देश असे आहेत ज्यांना भारत बायोटेकची कोरोना व्हॅक्सीन हवी आहे. या देशांमध्ये अमेरिका आणि ब्रिटनचा समावेश आहे. याशिवाय युरोपने सुद्धा भारत बायोटेकच्या व्हॅक्सीनमध्ये रस दाखवला आहे. कतार, स्विझरर्लंड, बहरीन, ऑस्ट्रिया आणि दक्षिण कोरियाने कोरोना व्हॅक्सीनच्या पुरवठ्यासाठी भारताशी संपर्क साधला आहे.