बेरोजगारांसाठी खुशखबर ! 10 वी पास तरुणांना पोस्टात नोकरीची संधी, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन – लॉकडाऊनमुळे देशात सगळीकडेच नोकऱ्यांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे लाखो तरुण नव्या नोकरीच्या (JOB) आणि संधीच्या शोधात आहेत. अशा परिस्थितीत भारतीय टपाल खात्यात दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची (JOB)  सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. टपाल खात्याने एक नोटिफिकेशन जारी करत याबाबत माहिती दिली आहे. 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना या पदासाठी अर्ज करता येणार असून स्टाफ कार ड्रायव्हर पदांसाठी ही भरती निघाली आहे.

इच्छुकांना टपाल खात्याच्या indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. टपाल खात्याच्या नोटिफिकेशनप्रमाणे स्टाफ कार ड्रायव्हर या पदांसाठी 12 जागांसाठी भरती केली जाणार आहे. यापैकी 4 पद ओबीसी आणि प्रत्येकी 1 पद एससी आणि एसटी श्रेणीतील उमेदवारांसाठी राखीव आहे.

उमेदवारासाठी पात्रता व अटी
भारतीय टपाल खात्याने या पदासाठी 10 उत्तीर्णची अट ठेवली आहे. तसेच उमेदवारांकडे वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. या पदांसाठी किमान वयोमर्यादा 18 आणि कमाल 27 वर्ष निश्चित केली आहे. या पदांसाठी अर्ज करताना उमेदवारांना कोणतंही शुल्क भरावे लागणार नाही. उमेदवारांची वाहन चालवण्याची चाचणी घेतली जाणार आहे. चाचणीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची या पदासाठी निवड केली जाईल. उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे अर्ज करता येणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे.

किती असेल वेतन अन् कुठे असणार नियुक्ती
या पदांवर निवड होणाऱ्या उमेदवारांना दरमहा 19,900 रुपये वेतन दिले जाणार आहे. तसेच उमेदवारांचे पोस्टिंगचे स्थान मुंबई असणार आहे.