10 वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! पोस्टामध्ये 4200 जागांसाठी भरती, परीक्षा नाही, जाणून घ्या

पोलिसनामा ऑनलाइन – ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेकडून दहावी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे.

ग्रामीण पोस्टल सर्व्हर (जीडीएस) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 आणि कमाल 40 वर्षे आहे. इंडिया पोस्टने गुजरात आणि कर्नाटक सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. गुजरात आणि कर्नाटक सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. गुजरात सर्कलमधील पदांची संख्या 1826 आणि कर्नाटक सर्कलमधील पदांची संख्या 2443 आहे. एकूण पदांची संख्या 4269 आहे. या पदांवर अर्ज करण्यास इच्छुक व पात्र असणारे उमेदवार भारतीय टपाल खात्याच्या संकेतस्थळावर ऑनलाइनअर्ज करु शकतात. ग्रामीण डाक सेवक पदासाठी अर्ज 21 डिसेंबर 2020 पासून सुरू होतील आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2021 आहे.

वयोमर्यादा: ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान 18 वर्षे आणि कमाल 40 वर्षे आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट देण्यात येईल. उमेदवारांचे वय 21 डिसेंबर 2020 पासून मोजले जाईल. वयोमर्यादेबद्दल अधिक माहितीसाठी अधिकृत सूचना पहा. तसेच उमेदवारांना स्थानिक भाषेचेही ज्ञान असले पाहिजे. तसेच, उमेदवाराला संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे. पात्रतेसंदर्भात संपूर्ण माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत सूचना पहावी.

अर्ज फी: सर्वसाधारण प्रवर्गाचे उमेदवार, ओबीसी, ईडब्ल्यूएस पुरुषांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल.