India Post : पोस्टातील बचत खात्यामधील पैशांची फसवणूक झालीयं ?, मग ‘हे’ काम करा, जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये विविध प्रकारचे बचत खाते उपलब्ध असतात. बँकेतील बचत खात्यांप्रमाणेच हे देखील काम करतात. बँकेप्रमाणेच या खात्यांवर देखील व्याज मिळत असते. बचत खात्यांबरोबरच विविध खात्यांवर देखील उत्तम व्याजदर मिळत असते. त्यामुळे बँकेपेक्षा पोस्टात खाते उघडणे मोठ्या प्रमाणात फायदेशीर ठरते.
उलट काही बँकांपेक्षा पोस्टात जास्त सुविधा मिळतात. त्याचबरोबर पोस्टात खाते उघडण्याची प्रक्रिया देखील खूप सोपी आहे. मात्र काहीवेळा आपण जमा केलेल्या पैश्याबाबतीत आपली मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. त्यामुळे आपल्याला काय करावे हे सुधारत नाही. यामुळे आज आम्ही तुम्हाला याविषयी सांगणार आहोत. भविष्यात तुमच्याबाबतीत कधीही असा प्रसंग घडला तर तुम्ही सावध होऊ याची काळजी घेऊ शकता.
तुमची फसवणूक झाल्यास सर्वात आधी सरकारच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करावा किंवा तक्रार केंद्रामध्ये तक्रार करावी. यासाठी तुम्हाला 1800 266 6868 या टोल फ्री क्रमांकावर फोन करण्याची गरज आहे. तसेच एटीएम कार्डच्या बाबतीत तुमची फसवणूक झाल्यास 1800 425 2440 या टोल फ्री क्रमांकावर फोन करण्याची गरज आहे.या क्रमांकावर फोन करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता.
त्याचबरोबर तुम्ही पोस्ट ऑफिसमधील अधीक्षक, पोस्टमास्तर किंवा तेथील अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. जर या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी तुमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही चीफ पोस्टमास्टर जनरल यांच्याकडे आपली तक्रार दाखल करू शकता.
Visit : Policenama.com
- केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात का? मग रोज ‘हे’ आवश्य खा
- घरच्याघरी तयार करा बाम, डोकेदुखीवर आहे रामबाण, अशी आहे पद्धत
- प्रथमच प्रणायाचा आंनद घेताय ? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, अशी घ्या काळजी
- घसा दुखतोय ? मग करा ‘हे’ खास घरगुती उपाय, ताबडतोब मिळेल आराम
- फॅशन करा पण, आरोग्यावर परिणाम होणार याची काळजी घ्या, ‘हे’ आहेत परिणाम
- ‘हे’ घरगुती उपाय केल्यास खोकला होईल गायब ! आवश्य करून पहा
- ज्येष्ठांनी घ्यावी काळजी, अन्यथा ‘हा’ आजार ठरू शकतो घातक,अशी घ्या काळजी
- उपाशीपोटी खा ‘ही’ ४ फळे, राहाल निरोगी, हृदयासह पचनाचे आजार होतील दूर