India Post ने सेव्हिंग अकाऊंटला दिला मोठा झटका, ग्राहकांना आता कमी मिळेल व्याज
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – India Post | तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) मध्ये बचत खाते असल्यास तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. कारण, पोस्ट विभागाच्या अंतर्गत येणार्या IPPB ने सर्व बचत खात्यांवरील व्याजदरात 25 बीपीएसने कपात केली आहे. कपातीनंतरचे नवीन दर 1 जून 2022 पासून लागू आहेत. (India Post)
किती झाले व्याजदर :
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक बचत खात्यावरील व्याजदर आता वार्षिक 2% आहे. पूर्वी वार्षिक व्याजदर 2.25 टक्के होता. हा व्याजदर बचत खात्यात ठेवलेल्या 1 लाख रुपयांपर्यंतच्या रकमेसाठी आहे.
तर, जर तुम्ही बचत खात्यात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि 2 लाख रुपयांपर्यंत ठेवत असाल तर आता व्याजदर वार्षिक 2.25 टक्के आहे. यापूर्वी या रकमेवर वार्षिक 2.50 टक्के दराने व्याज मिळत होते. हे व्याज दर तिमाही आधारावर ग्राहकांना दिले जातात. (India Post)
विमा योजनांनाही धक्का :
सरकारने विमा योजनांचा प्रीमियम वाढवला आहे – प्रधानमंत्री जीवन ज्योती (PMJJBY) आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा (PMSBY). PMJJBY चा प्रीमियम दर प्रतिदिन रु.1.25 इतका वाढवला आहे.
अशाप्रकारे तो वार्षिक 330 रुपयांवरून 436 रुपयांपर्यंत वाढला आहे. त्याच वेळी, PMSBY साठी वार्षिक प्रीमियम 12 रुपयांवरून 20 रुपये करण्यात आला आहे.
Web Title :- India Post | india post payments bank cuts interest rates on savings accounts by 25 bps detail here
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update