भारतीय पोस्ट ऑफीसनं 15 देशांसाठी आंतरराष्ट्रीय ‘Speed Post’ची बुकिंग केली सुरू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना व्हायरचा फैलाव झाल्यामुळे अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. तसेच करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमान सेवा देखील बंद करण्यात आली आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून भारताने देखील आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद केली आहे. याचा परिणाम पोस्ट ऑफिसवर झाला आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद असल्याने पोस्टाने आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्टाचे बुकिंग बंद केले होते. मात्र, आता भारतीय पोस्ट ऑफिसने आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्टाचे बुकींग सुरु केले आहे, अशी माहीती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विटरवून दिली आहे.


इंडियन पोस्ट ऑफिसने आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्टाचे बुकिंग सुरु केले आहे. ही सेवा सध्या केवळ 15 देशांसाठी आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, स्पाड पोस्टची डिलिव्हरी उड्डाणांच्या वेळेवर अवलंबून असेल. इतर आंतरराष्ट्रीय पार्सल आणि खात्यांचे बुकिंग सध्या तरी बंद राहील. भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च अखेरपासून लॉकडाऊन सुरु आहे. सध्या भारतातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे.