भारतीय पोस्ट विभागात नोकरी करण्याची ‘सुवर्ण’संधी, 10 वी पास उमेदवार करू शकतात अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर आपण दहावी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय डाक विभागाच्या आसाम सर्कलने ग्रामीण डाक सेवक पदांसाठी अर्ज मागविले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया 27 जानेवारी 2020 पासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय पोस्टल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 फेब्रुवारी 2020 आहे.

शैक्षणिक पात्रता –
उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळाकडून कोणत्याही विषयात दहावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. त्यासाठी किमान 60 दिवसांचे संगणक प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे देखील उमेदवारास बंधनकारक आहे. तसेच या अर्जासाठी सर्वसाधारण आणि ओबीसी प्रवर्गाच्या उमेदवारांना 100 रुपये अर्ज फी भरावी लागेल. इतर कोणत्याही श्रेणीतील उमेदवारांना कोणताही अर्जासाठी फी असणार नाही.

वयोमर्यादा –
05 ऑगस्ट 2019 रोजी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असणे आवश्यक आहे. त्याचवेळी राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा शिथिल करण्यात येईल. यासाठी पदांची संख्या 919 आहे.

अर्ज कसा करावा –
इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करण्यासाठी भारतीय टपाल विभागच्या या – https://indiapostgdsonline.in/  अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या.