चिंताजनक : जुलै-सप्टेंबर तिमाहीत GDP ग्रोथ रेट -7.5 टक्के: आर्थिक मंदीच्या दिशेने देश…!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्ष 2020-21 ची दुसरी तिमाही म्हणजे जुलै-सप्टेंबर तिमाहीचे आकडे जारी केले आहेत. दुसर्‍या तिमाहीत देशाचा जीडीपी -7.5 टक्के राहिला आहे. मात्र, हे आकडे एप्रिल-मे-जून तिमाहीच्या तुलनेत खूप चांगले आहेत. परंतु, लागोपाठ दोन तिमाहीतील निगेटिव्ह ग्रोथला तांत्रिकदृष्ट्या मंदी मानले जाते. शुक्रवारी सायंकाळी सरकाने जीडीपीचे आकडे जारी केले. मागील 40 वर्षांत प्रथमच जीडीपीमध्ये इतकी घट आली आहे, ज्यामुळे आकड्यांवर सर्वांची नजर आहे.

लागोपाठ दोन तिमाहीत आलेली जीडीपीमधील घट – जरी मागच्या तिमाहीपेक्षा कमी असली तरी लागोपाठ दोन तिमाहीत जीडीपीत घट झाल्याने देश चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत टेक्निकल रिसेशनच्या काळात गेला आहे. म्हणजे सरकारने अधिकृतपणे मंदी स्वीकारली आहे. मात्र, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) गव्हर्नरसह जगभरातील रेटिंग एजन्सीजचे म्हणणे आहे की, भारताचा विकासदर येणार्‍या काळात चांगला होईल. जर पहिल्या तिमाहीबाबत बोलायचे तर सकल स्थानिक उत्पादनात (जीडीपी) 23.9 टक्केची ऐतिहासिक घसरण झाली होती.

जीडीपी आकड्यांवर एक नजर

चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीचे आकडे -7.5 टक्के राहिले, तर रेटिंग एजन्सीजने हा आकडा -8.9 टक्के रहाण्याचा अंदाज वर्तवला होता. दुसर्‍या तिमाहीचा जीडीपी आकडा -7 टक्के, तर या आकड्याचा -8.6 राहण्याचा अंदाज वर्तवला होता. अ‍ॅग्री सेक्टर ग्रोथ 3.4 टक्के राहिली, तर अ‍ॅग्री सेक्टर ग्रोथ 3.9 टक्के राहण्याचा अंदाज होता. यानुसार दुसर्‍या तिमाहीचे आकडे खूप चांगले आहेत. यातून अंदाज लावता येईल की, पुढील आर्थिक वर्षात हे आकडे सकारात्मक होण्याची आशा आहे.

चालू तिमाहीत उद्योग क्षेत्रात 2.1, खनिज क्षेत्रात 9.1 आणि उत्पादन क्षेत्रात 8.6 टक्केची घसरण नोंदवली गेली आहे. मात्र कृषी क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रात किंचित वाढ नोंदली गेली आहे. कृषी क्षेत्रात जेथे 3.4 टक्के वाढीची नोंद झाली, तर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 0.6 टक्केची वाढ झाली आहे.

जीडीपी आर्थिक हालचालींचा स्तर दर्शवतो आणि यावरून समजते की, कोणत्या सेक्टर्समुळे यामध्ये तेजी किंवा घसरण आली आहे. यातून समजते की, वर्षभरात अर्थव्यवस्थेने किती चांगले किंवा खराब प्रदर्शन केले आहे. जर जीडीपी डेटा मंदी दर्शवत असेल, तर याचा अर्थ आहे की देशाची अर्थव्यवस्था मंद होत आहे आणि देशाने यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत आवश्यक वस्तूंचे उत्पादन केले नाही आणि सेवा क्षेत्रातसुद्धा घसरण राहिली.

मूडीजने आर्थिक वृद्धी दर अंदाज वाढवला

मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने कॅलेंडर वर्ष 2020 च्यासाठी भारताच्या आर्थिक वृद्धी दराचा अंदाज वाढवून (-) 8.9 टक्के केला आहे. अगोदर (-) 9.6 टक्के वृद्धीदराचा अंदाज व्यक्त केला होता. रेटिंग एजन्सीने गुरुवारी कॅलेंडर वर्ष 2021 साठी आर्थिक वृद्धी दराचा आपला अंदाज 8.1 टक्केने वाढवून 8.6 टक्के केला आहे.

ग्लोबल रिसर्च आणि ब्रोकिंग हाऊस गोल्डमॅन सॅक्स कॅलेंडर इयर 2021 मध्ये भारताचा जीडीपी 10 टक्केच्या दराने वाढू शकतो. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये हा सर्वांत जास्त आहे. पी फायझर आणि बायोएनटेकच्या वॅक्सीनच्या वृत्तानंतर रिसर्च कंपन्यांचा अंदाज आहे की, भारतासह जगातील सर्व अर्थव्यवस्थांमध्ये तेजी येऊ शकते, तर 2022 मध्ये ही ग्रोथ सुमारे 7.3 टक्के राहू शकते.

गोल्डमॅन सॅक्सच्या विश्लेषकांना आशा आहे की, वॅक्सीन आल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेत तेजी येईल. रिसर्च कंपनीने सांगितले की, पुढील वर्षी इकॉनॉमीमध्ये (Vaccine-Shaped) रिकव्हरी दिसून येऊ शकते. तर, भारताचे कॅलेंडर वर्ष 2022 च्या सकल स्थानिक उत्पादनाचा वृद्धी दर 7.3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे, जो पुन्हा जगातील 11 सर्वांत मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वांत जास्त आहे.

You might also like