कोरोना काळातही मोदी सरकारला मोठा दिलासा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात गेल्यावर्षी प्रमाणे यावेळीही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे मागील वर्षी GDP खालावलेली होती. मात्र आताच्या परिस्थितीत GDP वाढीचा वेग जास्त असेल असा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केला आहे. २०२१-२२ मध्ये भारताचा GDP वाढीचा दर ७.५ टक्के ते १२.५ टक्के इतका राहणार असल्याचा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे.

भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून केंद्र सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतला. मार्च ते जून २०२० या काळात लॉकडाऊन सुरू होता. त्याचा थेट परिणाम आर्थिक व्यवहारांवर पाहायला मिळाला. तर अनेक क्षेत्रांवर लॉकडाऊनचा बहुतांश परिणाम पाहायला मिळाला. तसेच जागतिक बँकेने दक्षिण आशिया लसीकरण अहवालात याबद्दलची माहिती देताना म्हटले आहे, २०२१-२२ मध्ये देशाचा GDP ७.५ ते १२.५ टक्के वेगानं वाढेल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. परंतु, मात्र हा विकास दर पूर्णपणे कोरोना लसीकरणावर अवलंबून असेल. आगामी काही महिन्यांत शेअर बाजारात तेजी बघायला मिळेल, असा अंदाजही व्यक्त केला आहे.

दरम्यान, सध्याच्या घडीला भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. परिस्थिती सुधारताना दिसत आहे. परंतु, कोरोना परिस्थतीती पाहता त्यामुळे राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध लादण्यात आले आहेत. काल देशात ५६ हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. यापैकी २८ हजार रुग्ण एकट्या महाराष्ट्रात राज्यात आहेत. याशिवाय पंजाब, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश या राज्यातील परिस्थितीही देखील गंभीर आहे.

इतर एजन्सी आणि संस्थांनी व्यक्त केलेला अंदाज 
Fitch – १२.८ टक्के
Moody’s – १२ टक्के
International Monetary Fund – ११.५ टक्के
Care ratings – ११-११.२ टक्के
एस एँड पी – ११ टक्के
RBI – १०.५ टक्के