COVID-19 in India : देशात 5 व्या वेळी एकाच दिवसात 4 लाखांपेक्षा जास्त कोरोना केस, चाचण्यांमध्ये घट तरीसुद्धा वाढताहेत प्रकरणं, भीतीदायक आहेत आकडे

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने चिंता वाढवली आहे. देशात पाचव्यांदा चार लाखापेक्षा जास्त कोरोनाची प्रकरणे सापडली आहेत आणि लागोपाठ चौथ्यांदा आहे जेव्हा कोरोना प्रकरणे चार लाखांच्या वर आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकड्यांनुसार मागील 24 तासादरम्यान देशात विक्रमी 4133 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि या दरम्यान 409,300 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अशाप्रकारे देशात आतापर्यंत एकुण 2,42,398 लोकांचा संसर्गाने मृत्यू झाला आहे. तर 2,22,95,911 लोक आतापर्यंत संक्रमित झाले आहेत.

आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार, देशात रोज सुमारे एक लाखापेक्षा जास्त सक्रिय रूग्णांमध्ये वाढ दिसून येत आहे. इकडे वाढत्या प्रकरणांदरम्यान बरे होणार्‍या रूग्णांच्या दरात घट झाल्याने संकट आणखी वाढले आहेत. देशात कोरोनाने बरे होण्याचा दर घसरून 81.90 टक्केवर पोहचला आहे. या दरम्यान 3,86,207 रूग्ण संसर्गातून बरे झाले. तर 1 एप्रिलला रूग्ण बरे होण्याचा दर 93.89 टक्के होतो.

भीतीदायक आहेत संसर्गाची प्रकरणे
* 30 एप्रिल : 4,02,014
* 5 मे : 4,12,624
* 6 मे : 4,14,280
* 7 मे : 4,06,902
* 8 मे : 4,03,626

80 टक्के सक्रिय प्रकरणे केवळ या 12 राज्यात
देशात यावेळी 37.23 लाखांपेक्षा जास्त सक्रिय प्रकरणे आहेत. तर यापैकी 80.68 टक्के प्रकरणे केवळ 12 राज्यांत आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त 6.28 लाख, कर्नाटकात 5.48 लाख, केरळात 4.17 लाख, यूपीत 2.45 लाख आणि राजस्थानात 1.99 लाख सक्रिय प्रकरणे आहेत. यानंतर आंध्र प्रदेश, गुजरात, तमिळनाडु, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, हरियाणा आणि बिहारमध्ये आहेत.

या राज्यात 70 टक्के नवीन प्रकरणे आली
मागील 24 तासादरम्यान देशाच्या 10 राज्यांत 70.77 टक्के कोरोनाची नवीन प्रकरणे समोर आली. यामध्ये सर्वात जास्त 56,578 महाराष्ट्रात, 47,563 कर्नाटकात, 31,971 केरळात, 26,636 यूपीमध्ये कोरोनाची प्रकरणे सापडली. यासोबतच तमिळनाडु, दिल्ली, पश्चिम बंगाल, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि हरियाणात सुद्धा कोरोनाच्या नवीन प्रकरणांत वाढ जारी आहे.

मेपासून विक्राळ होतोय कोरोना, हे आकडे पहा
* 8 मे 2021: 409,300 नवीन केस आणि 4,133 मृत्यू
* 7 मे 2021: 401,326 नवीन केस आणि 4,194 मृत्यू
* 6 मे 2021: 414,433 नवीन केस आणि 3,920 मृत्यू
* 5 मे 2021: 412,618 नवीन केस आणि 3,982 मृत्यू
* 4 मे 2021: 382,691 नवीन केस आणि 3,786 मृत्यू
* 3 मे 2021: 355,828 नवीन केस आणि 3,438 मृत्यू
* 2 मे 2021: 370,059 नवीन केस आणि 3,422 मृत्यू
* 1 मे 2021: 392,562 नवीन केस आणि 3,688 मृत्यू