Coronavirus in India : कोरोनाचा कहर सुरूच ! गेल्या 24 तसात देशात 1.26 लाख नवे पॉझिटिव्ह तर 685 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला असून, कोरोनाला रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे. तर दररोज एक लाखाच्या वर रुग्ण वाढताना दिसत आहे. भारतात आज अखेर सर्वाधिक रुग्णाचा आकडा हा मागील २४ तासामध्ये १ लाख २६ हजार ७८९ रुग्णाची नोंद झाली आहे. तर यामध्ये ६८५ कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. तसेच, ५९ हजार २८५ एवढे रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

गेल्या वर्षी प्रमाणे कोरोनाने यंदाही कहर केला आहे. यामुळे आणखी जीवन विस्कळीत होत असल्याचे दिसत आहे. एवढ्या रुग्णाची वाढ झाली असल्याने, यापूर्वी मंगळवारी देशात १ लाख १५ हजार रुग्ण आढळून आले होते. अर्थात मागील दोन दिवसात २ लाख ४० हजार रुग्णाची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णाची संख्या १ कोटी २९ लाख २८ हजार ५७४ इथपर्यंत गेली आहे. तसेच बरे झालेले रुग्ण हे १ कोटी १८ लाख ५१ हजार ३९३ इतके आहे. ९ लाख १० हजार ३१९ इतके रुग्ण उपचाराखाली आहेत. १ लाख ६६ हजार ८६२ इतकी मृतांची नोंद आहे. भारतात आतापर्यंत ९ कोटी १ लाख ९८ हजार ६७३ जणांना लस देण्यात आली आहे.

देशातल्या अनेक राज्याचा विचार करता सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून येत आहेत. तर राज्यात २४ तासांत राज्यात बुधवारी ५९ हजार ९०७ नवीन कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. तसेच ५६ हजार ६५२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर ३० हजार २९६ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात ३१ लाख ७३ हजार २६१ करोना बाधित आढळले आहेत. यामध्ये आताच्या स्थितीत ५ लाख १ हजार ५५९ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी, २१ हजार २१२ व्यक्ती या संस्थात्मक विलगीकरणात आहेत. अशी माहिती महाराष्ट्र आरोग्य विभागाने दिली आहे.