Coronavirus in India : देशात कोरोनाचा कहर ! गेल्या 24 तासात 2 लाखापेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 1038 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. दररोज कोरोनाबाधितांचा आकडा अधिक वाढत आहे. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. तर जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता तब्बल १३ कोटींच्या पुढे गेली आहे. तसेच लाखो नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. तर भारतात सुद्धा कोरोना रुग्णांची संख्यांची आकडेवारी वाढायला वेग आला आहे. यामुळे एक चिंता निर्माण झाली आहे.

भारतात दैनंदिन कोरोनाचा आकडा वाढताना दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. यामुळे अधिक धोका निर्माण झाल्याचे चिन्ह दिसत आहे. देशात रुग्णांची १ कोटीच्या पार झाली आहे. तर मागील २४ तासामध्ये कोरोनाबाधित रुग्णात उच्चांक गाठला आहे. धोकादायक आकडेवारी समोर येत आहे. तर भारतात मागील २४ तासांत कोरोनाचे २ लाख नवे रुग्ण सापडले आहेत. तसेच, सुमारे १ हजार ३८ जणांनी आपला प्राण गमावला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या १,४०,७४,५६४ पर्यंत गाठली आहे. तर कोरोना मृत्यूची संख्या १ लाख ७३ हजारापर्यंत आली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी १५ एप्रिलला दिली आहे.

अशा महाभयंकर कोरोनाच्या संकटात एक धक्कादायक घटना पुढं आली आहे. राजस्थानामध्ये जोधपूर येथे कोरोना रुग्ण दर २ मिनिटाला सापडत आहे. इतक्या वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. तर शहरात ७७० नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त ४ कोरोना रुग्ण मृत्युमुखी पडले आहे. येथील जोधपूर IIT मध्ये ७४ विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर आता जोधपूर शहरातील राजपुरोहित समाजाच्या वसतिगृहामध्येही कोरोनाने हाहाकार केला आहे. अशी माहिती CMHO ने दिली आहे.

दरम्यान, देशात कोरोनाने हाहाकार केला असून, येथे कुंभमेळ्यातील शाहीस्नान सोहळ्याला अनेक लाखो भाविकांची प्रचंड गर्दी दिसून आली होती. यामुळे नियमांचा फज्जा दिसून आला. तर शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या ही २८१२ वर पोहोचली आहे. महाकुंभ आणि शाहीस्थानामुळे कोरोना विस्फोट झाला आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. तसलेच आता हरिद्वारमध्ये केवळ २ दिवसांत १ हजाराहून जास्त रुग्ण सापडले आहे. हरिद्वारमध्ये मंगळवारी ५९४ तर सोमवारी ४०८ रुग्ण सापडले आहेत.