Coronavirus : देशात ‘कोरोना’चे थैमान सुरुच !  गेल्या 24 तासात 2.59 लाख नवे रुग्ण, 1700 अधिक मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णांची संख्या ही दीड कोटींच्या पुढे गेली आहे. सध्या देशात कोरोनाचा वेग झपाट्याने वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी उपाय केले जात आहेत. देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. गेल्या काही दिवसांपासू भारतात दररोज लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेतली जात आहे. मात्र, रुग्ण संख्या वाढत आहे. देशात महाराष्ट्रामध्ये रुग्ण वाढीचा वेग सर्वाधिक आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (मंगळवार) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तसांत कोरोनाचे 2 लाख 59 हजार 170 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1 हजार 761 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 53 लाख 21 हजार 089 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 80 हजार 530 वर पोहचला आहे. देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 20 लाख 31 हजार 977 एवढी आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील 6 लाख 76 हजार रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासात 1 लाख 54 हजार 761 रुग्ण बरे झाल आहेत. देशात आजपर्यंत 1 कोटी 31 लाख 08 हजार 582 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

दरम्यान, देशात कोरोना लाटेच्या दुसऱ्या टप्प्यात कहर पहायला मिळत आहे. मागील 12 दिवसांपासून पॉझिटिव्हिटी रेट दुप्पट झाला आहे. तर 10 राज्यांत 78 टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण आढळत आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट कधी ओसरणार असा प्रश्न देशातील जनतेला पडला आहे. देशात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्याचा निर्णय घेतला आहे.