Coronavirus : देशात ‘कोरोना’चा हाहाकार ! गेल्या 24 तासात 3.5 लाख नवीन रुग्ण, 2767 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात पुन्हा एकदा कोरोनाच्या कहराने डोकं वर काढलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून परिस्थिती चिंताजन झाली आहे. सध्या देशाच्या आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे. देशात ऑक्सिजनची कमतरता भासत असून अनेक रुग्णांना ऑक्सिजनअभावी आपले प्राण गमवावे लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात साडेतीन लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत. तर तब्बल अडीच हजारांच्यावर अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (रविवार) दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तसांत कोरोनाचे 3 लाख 49 हजार 691 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 767 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 69 लाख 60 हजार 172 एवढी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1 लाख 92 हजार 751 वर पोहचला आहे.

देशात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 26 लाख 82 हजार 751 एवढी आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील 6 लाख 94 हजार रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासात 2 लाख 17 हजार 113 रुग्ण बरे झाल आहेत. देशात आजपर्यंत 1 कोटी 40 लाख 85 हजार 110 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देशात 14 कोटी 09 लाख 16 हजार 417 लोकांना लस देण्यात आली आहे.