Coronavirus : ‘कोरोना’ची परिस्थिती गंभीर ! देशात गेल्या 24 तासांत 5 महिन्यातील सर्वाधिक 59,118 नवे रुग्ण तर 257 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरु लागली आहे. गेल्या 24 तासांत नवीन कोरोना रुग्णांचा आकडा 59 हजार 118 वर गेला आहे. तर 32 हजार 987 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण वाढत असताना मृतांचा आकडा देखील वाढत आहे. गेल्या 24 तासात देशात 257 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ही मागील पाच महिन्यातील सर्वाधिक रुग्ण संख्या आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत यानंतर दिल्ली, पंजाबमध्ये रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात 1 लाख कोरोना रुग्णांचा आकडा अवघ्या चार दिवसांत गाटला आहे. पंजाबमध्ये कोरोनाचे 2700 तर दिल्लीत 1500 नवे रुग्ण सापडले आहेत. तर महाराष्ट्रात सर्वाधिक 35 हजार 952 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्णांपैकी 2 लाख 62 हजार 885 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

देशात एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 8 लाख 46 हजार 652 इतकी झाली असून 1 कोटी 12 लाख 64 हजार 637 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या देशात 4 लाख 21 हजार 066 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर मृतांचा एकूण आकडा हा 1 लाख 60 हजार 949 वर पोहचला आहे. गुरुवारपर्यंत देशात 5 कोटी 55 लाख 4 हजार 440 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.