Coronavirus : देशात गेल्या 24 तासात 8171 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर 204 जणांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 2 लाखाच्या जवळ

नवी दिल्ली : देशाभरात सलग चौथ्या दिवशी ८ हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात देशात ८ हजार १७१ नवीन रुग्ण आढळून आल्याने देशातील कोरोना बाधितांची संख्या १ लाख ९८ हजार ७०६ इतकी झाली आहे. त्याचवेळी देशात गेल्या २४ तासात २०४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

देशभरातील कोरोना बाधितांची संख्या २ लाखांपर्यंत पोहचली असली तरी त्यापैकी ९७ हजार ५८१ रुग्ण अ‍ॅक्टिव्ह असून देशातील विविध रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. गेल्या २४ तासात देशभरातील रुग्णालयातून ३ हजार ७०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत देशभरातील तब्बल ९५ हजार ५२७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

गेल्या २४ तासात देशात २०४ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. आतापर्यंत देशात कोरोना बाधित ५ हजार ५९८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असली तरी बरे होण्याचे प्रमाणही वाढत चालेले असून आता ते ४८ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like