Coronavirus in India : दैनंदिन रुग्णवाढीचा सर्वोच्च उच्चांक ! गेल्या 24 तासांत ‘कोरोना’चे 93 हजारांपेक्षा अधिक रुग्ण, 513 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लगाला आहे. गेल्या 24 तासांत देशात तब्बल 93 हजार 249 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 24 लाख 58 हजार 509 एवढी झाली आहे. एका दिवसात नोंद होणारी ही आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे. काल (शनिवार) 81 हजार 446 रुग्ण आढळून आले होते.

दरम्यान गेल्या 24 तासात 60 हजार 048 जण उपचारानंतर बरे झाले असून 513 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आजपर्यंत 1 कोटी 15 लाख 25 हजार 39 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला 6 लाख 91 हजार 597 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 4 लाख रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आहेत. देशात 513 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 1 लाख 64 हजार 623 इतकी झाली आहे. दुसरीकडे देशात आतापर्यंत 7 कोटी 59 लाख 79 हजार 651 जणांचं लसीकरण करण्यात आले आहे.

देशात महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेशात सलग कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. कोरोना रुग्णवाढीत महाराष्ट्र आघाडीवर असून लवकरच ठाकरे सरकारकडून लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले आहेत.