Coronavirus : देशात 24 तासात ‘उच्चांकी’ 9851 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह तर सर्वाधिक 273 जणांचा मृत्यु

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला असून दररोज आदल्या दिवशीपेक्षा अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत़ गेल्या २४ तासात देशभरात सर्वाधिक उच्चांकी ९ हजार ८५१ नवीन रुग्ण आढळून आले आहेत़ तर सर्वाधिक २७३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

देशभरातील आतापर्यंत एकूण २ लाख २६ हजार ७७० कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली आहे. या एकूण रुग्णांपैकी १ लाख १० हजार ९६० अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

गेल्या २४ तासात देशात सर्वाधिक २७३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यापूर्वी २९ मे रोजी दिवसभरात २६९ रुग्णांचा मृत्यु झाला होता. आतापर्यंत देशात ६ हजार ३४८ जणांचा मृत्यु झाला आहे.

गुरुवारी दिवसभरात देशातील ४ हजार ३५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. आतापर्यंत देभरातील १ लाख ९ हजार ४६१ रुग्ण कोरोनातून मुक्त होऊन घरी गेले आहेत.

देशातील कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचा दर ४८ टक्क्यांहून अधिक झाला आहे. तसेच रुग्णांची दुप्पट होण्याचे दिवस १६ पर्यंत गेले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like