भारताची धावपटू हिमा दासचा ‘सुवर्ण’मयी विक्रम

फिनलंड : वृत्तसंस्था

भारताची धावपटू हिमा दास हिने अॅथलेटीक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारतीय इतिहासात नोंद केली आहे. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी हिमा ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. फिनलंडमध्ये सुरु असलेल्या वीस वर्षांखालील वयोगटाच्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करुन नवा इतिहास रचला आहे.

[amazon_link asins=’B07D7Z5V1Z’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’230c13bc-865b-11e8-a6b0-ad3d6bf6e0f9′]

फिनलंडमधील टॅम्परमध्ये ‘आयएएएफ वर्ल्ड अंडर 20’ अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप सुरु आहे. या स्पर्धेच्या 400 मी धावण्याच्या अंतिम फेरीत हिमाने नेत्रदीपक कामगिरी केली. या  फेरीत हिमाने 400 मी. अंतर 51.46 सेकंदांमध्ये पार करत अव्वल क्रमांक पटकावला हिमाने महिलांच्या 400 मीटर्स शर्यतीत सुवर्णपदक पटकावलं.

18 वर्षांची हिमा आसामची रहिवासी आहे. एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्टमध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत 400 मीटर इव्हेंटमध्ये ती सहावी आली होती. तर दुसरा क्रमांक रोमानियाच्या अँड्रिया मिकलोसने हे अंतर 52.07 सेकंदांमध्ये पूर्ण केले. तिसरा क्रमांक अमेरिकेच्या टेलर मॅन्सन पटकावला, तिने हे अंतर 52.28 सेकंदांमध्ये पूर्ण केले.

भारताच्या नीरज चोप्राने 2016 साली या स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत नवा विश्वविक्रम रचला होता. त्यानंतर हिमा दासही नीरज चोप्राच्या पंक्तीत विराजमान झाली आहे.