खुशखबर ! देशातील पहिली ‘कोरोना’ वॅक्सीन ’Covaxin’ तयार, ह्यूमन ट्रायलची मिळाली मंजूरी, जाणून घ्या केव्हापासून होणार ‘ट्रायल’

हैद्राबाद : भारताच्या पहिल्या स्वदेशी कोविड-19 वॅक्सीनला भारतीय औषध महानियंत्रकांकडून (डीसीजीआय) मानवी परीक्षणासाठी परवानगी मिळाली आहे. ‘कोवॅक्सिन’ नावाच्या वॅक्सीनची निर्मिती भारत बायोटेकने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्था (एनआयव्ही)सोबत मिळून केली आहे. देशात पुढील महिन्यापासून या लशीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्याचे परिक्षण सुरू होईल.

वॅक्सीनचे मानवी परीक्षण जुलैमध्ये होईल

वॅक्सीनचे मानवी परीक्षण जुलै 2020 मध्ये सुरू होणार आहे. भारतात कोविड-19 वॅक्सीनची निर्मिती करणारी ही कंपनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी (एनआयव्ही) च्या सहकार्याने हे वॅक्सीन तयार करण्याचा प्रयत्न करत आहे. सार्स-कोव्ह-2 वर प्रक्रिया करून एनआयव्ही, पुणेयेथे वेगळे केले होते आणि भारत बायोटेकमध्ये स्थानांतरित केले होते. भारत बायोटेकद्वारे स्वदेशी, लस तयार केली जात आहे.

भारत बायोटेकचे चेयरमन व एमडी डॉ. कृष्णा ईल्ला यांनी म्हटले की, आम्हाला कोविड-19 च्या पहिली स्वदेशी वॅक्सीन कोवॅक्सिनची घोषणा करताना अभिमान वाटत आहे. ही तयार करण्यात आयसीएमआर आणि एनआइव्हीचे सहकार्य उल्लेखनीय आहे. सीडीएससीओच्या सक्रिय दृष्टिकोणातून याच्या परीक्षणाची मंजूरी मिळाली आहे. कोविड-19 ची वॅक्सीन तयार करण्यासाठी संपूर्ण जग प्रयत्न करत आहे. मात्र, आतापर्यंत यश मिळालेले नाही. मात्र, काही कंपन्या वॅक्सीनच्या मानवी परीक्षणाच्या पहिल्या टप्प्यात पोहचल्या आहेत.

संपूर्ण भारतात होईल ह्यूमन क्लिनिकल ट्रायल

यापूर्वी कंपनीने प्री-क्लिनिकल स्टडीजचे निष्कर्ष सरकारी संस्थांना पाठवले होते. ह्यूमन क्लिनिकल ट्रायल पूर्ण भारतात सुरू करण्यात येईल. डॉ. कृष्णा एला यांनी म्हटले की, आमच्या आर अ‍ॅण्ड डी आणि निर्माण टीमने अथक परिश्रम केले. राष्ट्रीय प्रोटोकॉल्समधून जाताना कंपनीने व्यापक प्री-क्लिनिकल अभ्यास पूर्ण करण्यात वेगाने काम केले आहे, ज्याचे परिणाम चांगले आहेत.

आतापर्यंत कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या वॅक्सीनचा शोध लागलेला नाही. तर कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. देशात आतापर्यंत पाच लाखपेक्षा जास्त लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत. देशात आतापर्यंत 548318 लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. ज्यामध्ये आतापर्यंत तीन लाखांपेक्षा जास्त उपचार यशस्वी झाले आहेत, तर दोन लाखांपेक्षा जास्त संक्रमितांवर उपचार सुरू आहे. कोरोनाने आतापर्यंत देशात 16 हजार लोकांचा जीव गेला आहे.