भारतानं शोधलं ‘कोरोना’ व्हायरसवरील ‘उपचार’, देशातील पहिल्या रूग्णाच्या प्रकृतीत ‘सुधारणा’ ! अंतिम अहवालाची ‘प्रतिक्षा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या महिलेच्या प्रकृतीत सध्या सुधारणा होत आहे. रुग्णाच्या नमुन्याला केरळच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (National Institute of Virology) येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या रिपोर्ट नुसार रिजल्ट निगेटिव्ह आले होते. सध्या आरोग्य अधिकारी एनआयव्ही (NIV) पुणे यांच्या रिपोर्टची वाट पहात आहेत.

नुकतीच चीनच्या वुहानहून परत आलेल्या एका वैद्यकीय विद्यार्थिनीवर त्रिसूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. ३० जानेवारी रोजी रुग्णाला नोवल कोरोना व्हायरसचे पॉझिटिव्ह लक्षणे आढळल्यानंतर रुग्णाला आईसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले.

रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरच घेतील निर्णय
एनआयव्ही पुण्याचे रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर रुग्णाला रुग्णालयातून सोडण्याचा निर्णय घेतील. ही महिला वुहानहून परत आल्यानंतर ५ जणांच्या संपर्कात आली होती, त्यानंतर सर्वांचा शोध घेऊन त्यांना तपासले गेले असता सर्वांमध्ये हा व्हायरस निगेटिव्ह असल्याचे समोर आले.

भारतात जे ३ लोक कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकले आहेत हे तिन्ही वुहान येथे शिक्षणासाठी गेले होते आणि नेमके वुहान हेच कोरोना व्हायरसचे केंद्रबिंदू आहे. हे तिन्ही सोबतच घरी आले होते.

चीनमध्ये ९०८ लोकांचा मृत्यू
चीनमध्ये कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्यांची संख्या आता ९०८ वर पोहोचली आहे. तसेच या व्हायरसची लागण जवळपास ४०,००० पेक्षा अधिक लोकांना झाली आहे. डब्ल्यूएचओच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय तज्ञांचे एक पथक या महामारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चीन गाठत आहे. चिनी राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले की, रविवारी आणखी ९७ जणांचा मृत्यू झाला असून ३,०६२ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. ते म्हणाले की शनिवारी ज्या ९७ लोकांचा मृत्यू झाला त्या लोकांपैकी ९१ लोक हे हुबेई प्रांतातील होते, जेथे या व्हायरसमुळे सर्वात जास्त लोकांचा मृत्यू झालेला आहे. याव्यतिरिक्त, अनहुई येथे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच हेलॉन्जियांग, जिआंग्सी, हेनान आणि गांसु येथे प्रत्येकी एक व्यक्ती या व्हायरसमुळे मृत्यू पावली आहे.

४० हजाराहून अधिक प्रकरणांची नोंद
आयोगाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत ३१ प्रांतीय पातळीवरील भागात एकूण ९०८ लोकांचा बळी गेला आहे आणि एकूण ४०,१७१ प्रकरणांची नोंद झाली आहे. तसेच रविवारी आणखी ४००८ नवीन संशयित प्रकरणे नोंदली गेली. आयोगाने म्हटले आहे की रविवारी २९६ रुग्ण गंभीर आजारी पडले, ६,४८४ लोकांची प्रकृती चिंताजनक असून २३,५८९ लोकांना या व्हायरसचा संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.