…तर भारतातल्या  गावागावात  मिळणार १०० जीबी इंटरनेट स्पीड 

दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) तयार केलेल्या आतापर्यंतचा सर्वात वजनदार उपग्रह जीसॅट-११ उद्या प्रक्षेपण केलं जाणार आहे. बुधवारी सकाळी युरोपियन स्पेस एजन्सीच्या फ्रेन्च गुएना येथून हा उपग्रह प्रक्षेपित केला जाणार आहे. जीसॅट-११  हा उपग्रह ग्रामीण भागातील इंटरनेटसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे बोलले जात आहे.  यामुळे देशातील इंटरनेट स्पीड वाढणार असल्याचे  इस्रोने सांगितले आहे.
या उपग्रहाचे वजन ५,८५४ किलो वजनाचा असून तो पृथ्वीपासून ३६,००० किलोमीटर दूरवर जाणार आहे.जीसॅट-११ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर देशात प्रति सेकंदाला १०० जीबीपेक्षा जास्त इंटरनेट स्पीड मिळू शकतो, अशी माहिती भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे चेअरमन के. सिवन यांनी दिली. जीसॅट-११ हा अनेक गोष्टीं साठी सक्षम मानला जातो. यामुळे संपूर्ण देशाचं भौगोलिक क्षेत्र अवाक्यात येऊ शकणार आहे. यामध्ये वापरण्यात आलेले बीम अद्ययावत आहेत. यापूर्वीच्या उपग्रहात वापरण्यात आलेले बीम तेवढे शक्तिशाली नव्हते.
मार्च -एप्रिल महिन्यात या उपग्रहाच प्रक्षेपण होणार होतं.  मात्र  जीसॅट-६ चप्रक्षेपण अयशस्वी झाल्यामुळे या उपग्रहाच प्रक्षेपण लांबणीवर गेलं अनेक चाचण्या घेतल्यानंतर हा उपग्रह प्रक्षेपणासाठी  सज्ज झाला आहे.