विजय शंकरचे टीम इंडियात पुनरागमन, द. आफ्रिकेविरुद्ध संघ जाहीर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा करण्यात अली असून यामध्ये भारतीय संघाचा सदस्य विजय शंकर याचे पुनरागमन झाले आहे. या मालिकेसाठी मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्याकडे कर्णधारपद विभागून देण्यात आले असून पहिल्या तीन सामन्यांसाठी मनीष पांडे यांच्याकडे तर शेवटच्या दोन सामन्यांसाठी अय्यर याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले आहे.

29 ऑगस्टपासून या मालिकेला सुरुवात होणार असून यासाठी काल भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आली. या संघात भारतीय संघातील वर्ल्डकप खेळलेला खेळाडू विजय शंकर याचे पुनरागमन झाले असून भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहलही या सामन्यांत खेळणार आहे. त्याचबरोबर या संघात संजू सॅमसन तसेच ईशान किशन यांचा देखील समावेश आहे. या मालिकेतील पहिला सामना २९ ऑगस्ट रोजी खेळवला जाणार असून इतर सामने अनुक्रमे 31 ऑगस्ट, 2, 4 व 8 सप्टेंबर असे खेळवले जाणार आहेत.

या मालिकेसाठी भारतीय अ संघ

पहिल्या तीन सामन्यांसाठी भारतीय अ संघ

मनिष पांडे (कर्णधार), रुतूराज गायकवाड, इशान किशन, विजय शंकर, शिवम दुबे, कृणाल पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, शार्दूल ठाकूर, दीपक चहर, खलील अहमद, नितीश राणा, शुबमन गिल, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई.

शेवटच्या दोन सामन्यांसाठी भारतीय अ संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), शुबमन गिल, संजू सॅमसन, नितीश राणा, विजय शंकर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, राहुल चहर, शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे, इशार पोरेल, प्रशांत चोप्रा, अनमोलप्रीत सिंग, रिकी भुई.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like