इंग्लंडविरुद्धच्या टी- 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा शनिवारी (दि. 20) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केली आहे. संघात सुर्यकुमार यादव, राहुल तेवतिया, श्रेयस अय्यर, टी नटराजन, शार्दुल ठाकूर, इशान किशन आदी युवा खेळाडूंचा समावेश आहे. तर भारताचा हुकमी गोलंदाज भुवनेश्वर कुमारचेही संघात पुनरागमन झाले आहे. पण भारताचा युवा फलंदाज संजू सॅमसन याला वगळण्यात आले आहे.

भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध एकूण 5 टी-20 सामने खेळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बायो-बबलच्या नियमांनुसार हे 5 ही सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. पहिला सामना 12 मार्च रोजी होईल तर 20 मार्च रोजी शेवटचा सामना खेळविला जाणार आहे. भारतीय संघ सध्या तिसऱ्या कसोटीसाठी याच स्टेडियमवर सराव करत असून 24 फेब्रुवारी रोजी या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.

असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रिषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आदींचा संघात समावेश आहे.