इंडिया स्टार इंडिपेंडेंट अवार्डने ब्रह्मा कुमारी केंद्राच्या संचालिका मिरा वाडकर सन्मानित

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – ब्रह्मा कुमारी मीरा वाडकर ( दीदी ) यांना सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इंडिया स्टार इंडिपेंडेंट अवार्डने (22 ऑक्टोबर) गौरविण्यात आले.

सोनपेठ शहरातील ब्रह्मा कुमारी केंद्राच्या माध्यमातून ब्रह्मा कुमारी मीरा वाडकर (दीदी) यांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना बर्‍याच गोष्टी केल्या. विशेष म्हणजे त्यांनी कोरोना कालावधीत गरजूंना धान्य किट, स्वच्छताविषयक ( सॅनिटायझर ) कपडे आणि हातपाय धुण्यासाठी साबण, मास्क आदी मोफत वितरित केले.

नारी शक्तीच्या सन्मानार्थ नवरात्रोत्सवानिमित्त गुरुवार ( 22 ) ऑक्टोबर रोजी सोनपेठ येथील तहसील कार्यालयात ब्रह्मा कुमारी मीरा दीदी यांचा सन्मान करण्यात आला. या पुरस्कारासाठी दीदींची निवड काही महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आली होती. गुरुवार रोजी शहरातील तहसील कार्यालय येथे पुरस्कार प्रदान करण्यात आल्या प्रसंगी उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आपले विचार व्यक्त करताना मीरा दीदी म्हणाल्या की, निस्वार्थ सेवेच्या माध्यमातून समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र यापुढेही कार्य करत राहील. आपल्या सहकार्याची भावना सकारात्मक ऊर्जा आणते. मिळालेल्या ऊर्जा शक्तीचा तन-मन-धनाने समाज हितासाठी वापर करू. कधीही न संपणारा प्रेरणा शक्तीचा स्त्रोत आहे. शेवटी बोलताना त्या म्हणाल्या की, त्याग आणि निःस्वार्थ सेवेबद्दल प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे. त्याग आणि परोपकार यातून सामाजिक एकोपा निर्माण होतो.

यावेळी तहसीलदार आशिष कुमार बिरादार, पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, नायब तहसीलदार ऐश्वर्या गिरी, जनसेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष साजिद कुरेशी, आदींची उपस्थिती होती. तहसीलदार आशिष कुमार बिराजदार पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या हस्ते ब्रह्मा कुमारी मीरा वाडकर दीदी यांनी पुरस्कार स्वीकारला.

You might also like