Corona नंतर देशात परदेशातून आले 8 आणखी Virus, वैज्ञानिकांनी केलं सावध !

नवी दिल्ली : वृत्त संस्था – कोरोना व्हायरसला तोंड देणार्‍या भारताला परदेशातून आलेल्या 8 अन्य व्हायरसला सुद्धा तोंड देण्यासाठी व्यवस्था करावी लागू शकते. देशाच्या सात संशोधन संस्थांनी कोरोना व्यतिरिक्त परेदशातून आलेल्या लोकांसोबत भारतात आलेल्या व्हायरसच्या स्क्रीनिंगसाठी सरकारकडे सुद्धा शिफारस केली आहे.

या संस्थांनी सरकारला म्हटले आहे की, कोविड-19 सोबत परदेशातून आलेल्या आठ अन्य व्हायरसची स्क्रीनिंग सुद्धा करण्यात यावी. जे लोक परदेशातून भारतात आले आहेत, त्यांच्या सोबत आठपैकी श्वासासंबंधी आजारांचे व्हायरस आले आहेत.

भारतात आलेल्या 362 लोकांच्या सॅम्पलवर शोध

केरळ आणि पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या संशोधकांनी जानेवारीपासून फेब्रुवारीदरम्यान भारतात आलेल्या 362 लोकांच्या सॅम्पलवर संशोधन केले आहे. यापैकी 84 लोग संक्रमित सापडले आहेत. ज्यापैकी केवळ चार लोकांमध्येच सार्स कोरोना-2 व्हायरस मिळाला आहे. अन्य लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचे श्वासासंबंधीचे व्हायरस सापडले आहेत, ज्यांची लक्षणे जवळपास सारखी आहेत.

संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांना सांगितले की, हा श्वासाशी संबंधीत संसर्ग आहे. यामध्ये काही भारतात यापूर्वी सुद्धा मिळालेले आहेत. जर योग्य ती खबरदारी घेतली नाही तर हा संसर्ग नुकसानदायक होऊ शकतो.

प्रवाशांची झाली आरटी पीसीआर तपासणी

संशोधनानुसार, 22 जानेवारीपासून 29 फेब्रुवारी दरम्यान 362 सॅम्पल देशाच्या विविध एयरपोर्टवर स्क्रीनिंगदरम्यान घेतले गेले होते. या सर्वाची आरटी पीसीआर तपासणी केली गेली तेव्हा तीन केरळ आणि एक दिल्लीचा रहिवाशी रूग्ण संक्रमित सापडला.

हे चार देशांचे पहिले कोरोना संक्रमित रूग्ण होते, जे आता बरे होऊन परतले आहेत. मात्र उर्वरित लोकांमध्ये इन्फ्लूएंजा ए, बी, मानवी कोरोना व्हायरस, रायनो व्हायरस, एडिनो आणि पॅरा इन्फ्लूएंजा व्हायरस सुद्धा मिळाले आहेत.

362 पैकी 250 पुरुष आणि 109 महिलांचे सॅम्पल होते. बहुतांश 258 लोकांचे सरासरी वय 21 से 40 वर्ष होते. यापैकी बहुतांश वैद्यकीय विद्यार्थी किंवा नोकरी करणारे लोक होते. 84 लोकांमध्ये एक किंवा एकापेक्षा जास्त श्वासासंबंधी आजाराचे व्हायरस मिळाले आहेत. अन्य 10 लोकांमध्ये सह संक्रमण आणि अन्य 278 निगेटिव्ह सापडले होते. कोरोना व्हायरससुद्धा श्वसन तंत्राशी संबंधीत संसर्ग आहे. 41 ते 50 वर्षांच्या लोकांमध्ये याचा संसर्ग जास्त प्रमाणात आढळून येत आहे.

57 लोकांमध्ये कफ प्रमुख लक्षण

संशोधक डॉ. वर्षा पोतदार यांच्यानुसार, व्हायरस पॉझिटिव्ह 57 लोकांमध्ये कफ हे प्रमुख लक्षण होते. 48 लोकांमध्ये ताप, 42 लोकांना घशात दुखणे, 29 लोकांना सर्दी आदी त्रास होता. संक्रमित रूग्णांपैकी 12 जणांच्या सॅम्पलमध्ये अँटीव्हारल आणि 31 जणांच्या सॅम्पलमध्ये अँटीबॉयोटिक्स सुद्धा मिळाले आहेत.

परदेशातून आलेल्या लोकांमध्ये कारोनाशिवाय अन्य संसर्गाचा शोध घेण्यासाठी हे संशोधन करण्यात आले होते. स्क्रीनिंगच्या दरम्यान कोरोनाच्या शिवाय दुसर्‍या संसर्गाकडेही लक्ष दिल्यास त्याचीही माहिती मिळू शकते.

या संशोधनानुसार, 22 जानेवारीपासून 7 फेब्रुवारीपर्यंत घेण्यात आलेले सॅम्पल सर्वात जास्त संक्रमित सापडले होते. तर 14 ते 28 फेब्रुवारीपर्यंत एक सुद्धा सॅम्पल संक्रमित मिळाले नाही. परंतु, 29 फेब्रुवारीला तीन प्रकारचे व्हायरस मिळाले. नॅशनल इन्फ्लूएंजा सेंटरसह सात समुहामध्ये सहभागी शास्त्रज्ञांनी हे संशोधन पूर्ण केले.

हे 8 व्हायरस मिळाले-

इन्फ्लूएंजा ए
25 प्रवाशांमध्ये हा व्हायरस मिळाला आहे. यास फ्लू नावाने सुद्धा ओळखले जाते. हा थेट श्वसन यंत्रावर अटॅक करतो. याची सुरूवात खोकला, सर्दी, हलका ताप याने होते. दुर्लक्ष केल्यास हा आजार घातक रूप धारण करतो.

इन्फ्लूएंजा बी
ए प्रमाणेच इन्फ्लूएंजा बी व्हायरस असतो. जो सात लोकांमध्ये आढळला आहे. मात्र ए च्या तुलनेत बी व्हायरस मंद असतो.

मानव कोरोना व्हायरस
21 लोकांमध्ये हा व्हायरस मिळाला आहे. जगात आतापर्यंत सात प्रकारचा कोरोना व्हायरस मिळाला आहे, परंतु आता जो सुरू आहे तो यापेक्षा वेगळा आहे.

रायनो व्हायरस
परदेशातून आलेल्या 15 लोकांमध्ये हा व्हायरस मिळाला आहे. कोविड-19 प्रमाणे याचा परिणाम सुद्धा पाच दिवसानंतर दिसून येतो. फ्लू सारखी लक्षणे दिसतात.

एडिनो व्हायरस
चार लोकांमध्ये हा व्हायरस सापडला. या व्हायरसची लक्षणे सुद्धा सर्दी, खोकला, ताप इत्यादी आहेत. काळजी घेतल्यास यापासून बचाव होऊ शकतो.

पॅरा इन्फ्लूएंजा
हे संक्रमण सर्वसामान्यपणे थंडीच्या दिवसात आढळते. 10 लोकांमध्ये हा व्हायरस आढळला आहे. याचे लक्षणे इतर फ्लू प्रमाणेच असतात.

आरएसव्ही
श्वसनाशी संबंधीत हे संक्रमण 6 लोकांमध्ये आढळले. श्वास घेण्यास त्रास अशी याची लक्षणे आहेत.

मॅटानिमो
मानव मॅटाफिनोमी व्हायरस दोन लोकांमध्ये मिळाला आहे. हा वरच्या आणि खालच्या श्वास रोगाचे कारण ठरतो. रोग प्रतिकारकशक्ती कमजोर असल्यास तो गंभीर रूप धारण करतो.


22 जानेवारी ते 29 फेब्रुवारी दरम्यान घेतलेल्या सॅम्पलची स्थिती –

वय                  निगेटिव्ह            संक्रमित             संक्रमण दर                        टक्क्के
0-10                 16                    11                      5                                  31.3
11-20              38                     28                        10                               26.3
21-30             159                    127                       32                               20.1
31-40             99                      75                         24                              24.2
41-50            30                       19                          11                              36.7
51-60            12                       10                           2                               16.7
61-70            5                          5                            0                               0.0
70 पेक्षा जास्त   3                         3                           0                                0.0
एकुण              362                     278                      84                                23.2संक्रमित रूग्णांमध्ये मिळाले व्हायरस –

व्हायरस                                 रूग्ण

इन्फ्लूएंजा ए                          25
इन्फ्लूएंजा बी                             7
मानव कोरोना व्हायरस               21
रायनो व्हायरस                         15
पॅरा इन्फ्लूएंजा                          10
आरएसव्ही                                6
सार्स कोविड 2                         4
एडिनो                                    4
एचएमपीवी                             2