27 वर्षानंतर सुनील कुमारने रचला इतिहास, आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये जिंकले गोल्ड मेडल

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारताच्या सुनील कुमारने दिल्लीमध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने 87 किलो ग्राम ग्रीको रोमन श्रेणीत सुवर्ण पदक जिंकले आहे. हे गोल्ड मेडल यासाठी महत्वपूर्ण आहे, कारण भारताने 27 वर्षानंतर ग्रीको रोमनमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. शेवटचे गोल्ड मेडल 1993 मध्ये पप्पू यादवने जिंकले होते.

फायनल मॅचमध्ये सुनीलने किर्गिझस्तानच्या अजात सलिदिनोवला पराभूत करून गोल्ड जिंकले. यापूर्वी प्रथम सुनील कुमारने कझाकिस्तानच्या अजामतला 12-8 ने पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. तो 2019 मध्येही फायनलमध्ये पोहचला होता, परंतु तेव्हा त्याला रजत पदकावर समाधान मानावे लागले होते.

यापूर्वी अर्जुन हालाकुर्कि (55 किग्रा) च्या सेमीफायनलमध्ये चांगल्या स्थितीत असताना मॅच गमावली होती. तेव्हा तो इराणच्या पौया मोहम्मद नासेरपौरकडून 7-8 ने पराभूत झाला होता. कांस्य पदकासाठी अर्जुनची लढत कोरियाच्या डोगह्येओक वोन सोबत होणार आहे. मेहर सिंहला सुद्धा अंतिम चारच्या स्पर्धेत पराभवाचा समाना करावा लागला होता. त्याला कोरियाच्या मिंसेओक किमने 9-1 ने पराभूत केले होते.

You might also like