India Vs Bangaladesh, 1st Test Match : भारताचा बांगलादेशवर मोठा विजय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशचा 1 डाव आणि 130 धावांनी पराभव केला. पहिल्या डावात भारताने सलामीवीर मयांक अगरवाल याच्या द्विशतकि खेळीच्या जोरावर मोठी धावसंख्या उभारली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावरच भारतीय संघाने पहिल्या डावात 343 धावांची आघाडी मिळवली होती. त्यानंतर या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव हा केवळ 213 धावांत आटोपला. आणि भारताने 1 डाव 130 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली.

त्याआधी पहिल्या डावात देखील बांगलादेशला केवळ 150 धावा करता आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील बांग्लादेशच्या संघाच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरशः नांगी टाकली. भारताच्या वतीने मोहम्मद शमी याने पहिल्या डावात सर्वाधिक 3 बळी मिळवले होते तर भारताने आपला पहिला डाव 6 बाद 493धावांवर घोषित केला होता.

या डावात मयांक अगरवाल याने शानदार 243 धावा झळकावल्या होत्या तर अजिंक्य रहाणे याने 86 धावा केल्या होत्या. या दोघांच्या शानदार खेळीच्या बळावर भारताने 343 धावांची आघाडी घेतली होती. या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकला नाही.

दुसऱ्या डावात भारताच्या मोहम्मद शमी याने पुन्हा एकदा शानदार कामगिरी करत 3 बळी मिळवले. तर फिरकीपटू रवी अश्विन याने चार बळी मिळवले. दरम्यान, भारताने या विजयासह मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून दुसरा कसोटी सामना कोलकात्यामधील ईडन गार्डनवर डे – नाईट खेळवला जाणार आहे.

Visit : Policenama.com