PoK वर कब्जा करणार इंडिया ! पाकिस्तानचं लष्कर आणि इमरान खान यांची बोलती बंद, घाबरलेल्या बाजवा यांनी लिहीलं पत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलवान व्हॅलीच्या घटनेनंतर जगातील मोठी ताकद भारताच्या बाजूने उभी राहिलेली पाहून पाकिस्तानची बोलती बंद झाली आहे. गलवान व्हॅलीच्या घटनेनंतर चीन बॅकफूटवर असल्याचे पाकिस्तानच्या संरक्षण तज्ञांनी सरकारला सांगितले आहे. रशिया आणि अमेरिका देखील भारताबरोबर उभे आहेत. भारताचे नुकसान होत नसून त्यांना फायदा जास्त होत आहे. भारतातील सैन्याचे धैर्यही बरेच वाढले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण तज्ञांनी जनरल बाजवा आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना चेतावणी दिली आहे की, भारत संधीचा फायदा घेऊन पाकिस्तानवर भीषण हल्ला किंवा सर्जिकल स्ट्राइक करू शकतो. पाकिस्तानमध्ये सद्य परिस्थितीत भारत पीओकेवर हल्ला करू शकतो, ही भीती देखील निर्माण झाली आहे.

पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल बाजवा संरक्षण तज्ञांच्या सल्ला-मसलतीनंतर सर्वात जास्त घाबरलेले दिसत आहेत. जनरल बाजवा यांनी वेस्टर्न फ्रंटमधील स्ट्राइकिंग फोर्सच्या तुकड्यांना इस्टर्न फ्रंटच्या दिशेने कूच करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वहावलपूर येथील न्यूक्लियर इन्स्टॉलेशनला सतर्क व स्ट्राइकिंग मोडवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय बाजवा यांनी पीओके काश्मीरच्या आरोग्यमंत्र्यांना वैयक्तिक पत्र लिहून ५० टक्के बेड आर्मीच्या आपत्कालीन परिस्थितीत राखीव ठेवण्याचे आवाहन केले आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाजवा यांची चिट्ठी लीक झाल्यानंतर पीओकेमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्वांना भीती वाटत आहे की, भारत पीओकेवर हल्ला करणार आहे. याच कारणास्तव काही लोकांनी मुझफ्फराबाद सोडले आहे. मुजफ्फराबाद आणि मीरपूरच्या लोकांनी अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचा साठा सुरू केला आहे. ही परिस्थिती केवळ पीओके मध्येच नाही तर कराची, इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही हीच परिस्थिती आहे. रात्रीच्या अंधारात एखादा स्फोट झाला, तर पाकिस्तानी लोकांना असे वाटते कि भारताने हल्ला केला आहे.