नेपाळमध्ये 25 आरोग्य पोस्टच्या पुनर्बांधकामासाठी 33.40 कोटी देणार भारत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेपाळमध्ये भारतीय दुतावासाने शुक्रवारी 25 आरोग्य पोस्टच्या पुनर्बांधकामासाठी चार करारावर हस्ताक्षर केले. यासाठी भारत 33.40 कोटी रुपये (530 बिलियन नेपाळी करन्सी) खर्च करणार आहे.

भारतीय दुतावासातून जारी एका वक्तव्यात म्हटले आहे की, दुतासाच्या डेव्हलपमेंट पार्टनरशिप अँड रिकन्स्ट्रक्शन विंगचे प्रमुख आणि नेपाळच्या नॅशनल रिकन्स्ट्रक्शन अथॉरिटीसोबत करारावर हस्ताक्षर केले. 25 आरोग्य पोस्टपैकी 12 धाडिंग जिल्ह्यात आणि 13 सिंधुपालचौक जिल्ह्यात आहेत.

या आरोग्य पोस्टचे 2015 मध्ये आलेल्या भीषण भुकंपात मोठे नुकसान झाले होते. भारताच्या मदतीने यांचे पुनर्बांधकाम होणार आहे. यानिमित्ताने चार काँट्रॅक्ट करार सुद्धा झाले आणि यासाठी ठेकेदारांना तसेच सीएलपीआययू बिल्डिंगमध्ये करार झाला. सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टीट्यूट (सीबीआरआय)-च्या पुनर्बांधकामासाठी तांत्रिक मदत पुरवणार आहे.